भयंकर PHOTO: तालिबान्यांनी 100 निष्पाप अफगाणांना केलं ठार, झेंडे फडकावून साजरा केला उत्सव
स्पिन बोल्डक प्रांतात तालिबान्यांनी हल्ला केल्याची माहिती देशाच्या गृह मंत्रालयाने दिली आहे. तिथल्या 100 हून अधिक नागरिकांना ठार करण्यात आलंय. हा अफगाणिस्तानचा सीमावर्ती भाग आहे आणि पाकिस्तानला लागून आहे.
अफगाणिस्तानातील 90 टक्के भाग तालिबान्यांनी ताब्यात घेतला आहे. गुरुवारी तालिबानी अतिरेक्यांनी स्पिन बोल्डक भागात भयानक हल्ला केला. यात 100 हून अधिक निष्पाप अफगाण नागरिकांचा बळी घेतला आहे. 100 लोकांचे मृतदेह अद्याप जमिनीवर पडले आहेत.
2/ 6
स्पिन बोल्डक कंदाहारजवळचं एक प्रमुख ठिकाण आहे. हा सगळा सीमावर्ती भाग आहे.
3/ 6
काही दिवसांपूर्वीच या जागेवर तालिबान्यांनी कब्जा केला होता. ही जागा तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर अफगाण सुरक्षा दलाने ही जागा परत मिळवण्यासाठी लढा दिला होता. कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी तिथल्या नागरिकांची घरं लुटली, त्यांचे झेंडे फडकावले आणि निष्पाप लोकांची हत्या केली.
4/ 6
फ्रान्स 24 ने पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये तालिबानी अतिरेकी शहरात तोडफोड करताना, घरं लुटताना आणि तिथून पळून गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची वाहनं जप्त करताना स्पष्टपणे दिसत आहेत.
5/ 6
अफगानिस्तानमध्ये तालिबानी अतिरेकी आपलं नियंत्रण वाढवत आहेत. प्रमुख शहरं आणि सीमा ओलांडत आहेत. सुमारे 400 जिल्हे त्यांच्या ताब्यात आहेत. जवळ जवळ अर्ध्या देशावर त्यांचा ताबा आला आहे.
6/ 6
रशियाची अधिकृत वृत्तसंस्था RIA नोव्होस्तीशी बोलताना तालिबानी प्रवक्ता झाबीउल्ला मुजाहिदनी म्हटलं आहे की, 'अफगाणिस्तानची सीमा तजाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ईराणला जोडलेली आहे. म्हणजेच 90 टक्के सीमेवर आता आमचं नियंत्रण आहे.'