• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Mehwish Hayat: दाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा

Mehwish Hayat: दाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा

पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयात (Mehwish Hayat) हिला आता पाकिस्तानची पंतप्रधान बनायची इच्छा (Dawood Ibrahim’s Girlfriend Mehwish Hayat Wants To Be Pakistan's PM) आहे.

 • Share this:
  इस्‍लामाबाद 27 जुलै: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची कथित गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयात (Mehwish Hayat) हिला आता पाकिस्तानची पंतप्रधान बनायची इच्छा (Mehwish Hayat Wants To Be Pakistan's PM) आहे. इतकंच नाही तर ती सध्याचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षावरही फार इम्प्रेस आहे. महविश हिनं असा दावा केला आहे, की इम्रान खान जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून पाकिस्तानात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. ती म्हणाली, की जर एक क्रिकेटर पंतप्रधान बनू शकतो तर एक अभिनेत्री का नाही? VIDEO : सांगलीकरांचा काही नेम नाही! चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्ही इम्रान खानला राजकीयदृष्ट्या आव्हान देणार आहात का, असे जेव्हा महविश हयात हिला विचारले गेले तेव्हा ती म्हणाली की, मी त्यांना आव्हान देऊ इच्छित नाही. मात्र, नंतर कोणाला तरी त्यांची जागा घ्यावी लागेल आणि मी पंतप्रधानपदाची दावेदार होऊ शकते. पाकिस्तानमध्ये पीटीआयचं सरकार सत्तेवर आल्यापासून समाजाच्या विचारसरणीत बदल होत असल्याचा दावा तिनं केला. पाकिस्तानी अभिनेत्री म्हणाली की, देशात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा तिचा मानस आहे. ती म्हणाली की, संसदेत पोहोचून की नवा पक्ष स्थापन करून माझे स्वप्न पूर्ण होईल हे वेळ सांगेल. काही दिवसांपूर्वीच मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला होता, की दाऊद पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातसोबत (Mehwish Hayat) रिलेशनशिपमध्ये आहे. असंही बोललं जात आहे, की ही बातमी चर्चेत आल्यामुळे डॉन चिडला आणि ही माहिती सार्वजनिक कशी झाली याचा तपास करीत आहे. दिल, दोस्ती आणि लग्न! सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात? माध्यमांमधून दावा केला जात आहे, की दाऊदपेक्षा 27 वर्षांनी लहान असलेली महविश त्याची सर्वात मोठी कमजोरी आहे. गेल्या वर्षी मेहविशला 'तमगा-ए-इम्तियाज' हा नागरी सन्मान मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर यासंबंधीची चर्चा प्रत्यक्षात सुरू झाली होती. असं म्हटलं जातं की, महविशला एका आयटम साँगमध्ये पाहून दाऊद तिच्यावर फिदा झाला आणि यानंतर त्याने मेहविशला अनेक मोठे प्रोजेक्ट्स मिळवून देण्यात मदत केली.
  Published by:Kiran Pharate
  First published: