जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / TikTok चं वेड पडलं भलतंच महागात, व्हिडिओ बनवताना 13 वर्षाच्या मुलीनं स्वतःला घेतलं पेटवून

TikTok चं वेड पडलं भलतंच महागात, व्हिडिओ बनवताना 13 वर्षाच्या मुलीनं स्वतःला घेतलं पेटवून

file photo

file photo

एका तेरा वर्षीय मुलीनं टिकटॉक व्हिडिओ (TikTok Video) बनवण्याच्या नादात स्वतःलाच पेटवून घेतलं आहे. ही मुलगी टिकटॉकवर एक फायर चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन 07 जून: सोशल मीडियाच्या आहारी गेलेल लोक प्रसिद्धी मिळवण्याासाठी अगदी स्वतःच्या जीवाशी खेळ करायलाही मागे-पुढे पाहात नाहीत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका तेरा वर्षीय मुलीनं टिकटॉक व्हिडिओ (TikTok Video) बनवण्याच्या नादात स्वतःलाच पेटवून घेतलं आहे. ही मुलगी टिकटॉकवर एक फायर चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना अमेरिकेच्या पोर्टलँड (Portland) येथील आहे. रक्ताचे नाते जिवावर उठले, कुऱ्हाडीने वार करून पुतण्याने काकाला संपवले द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पीडितेचं नाव डेस्टिनी क्रेन असं आहे. टिकटॉक व्हिडिओ बनवताना या मुलाचा हात आणि मान गंभीररित्या जळाली आहे. टिकटॉक व्हिडिओ बनवताना आग लावण्याची ट्रिक चुकीची झाल्यानं ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बाथरुमध्ये आरशाच्या समोर उभा राहून आगीपासून वेगवेगळे आकार बनवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे, की ब्लास्ट झाल्यामुळे डेस्टिनीला दुखापत झाली आहे. बोको हरामचा दहशतवादी शेकऊची आत्महत्या, शाळकरी मुलींच्या अपहरणामुळे होता चर्चेत डेस्टिनीच्या आईनं सांगितलं, की त्यांना बाथरुममध्ये एक मेणबत्ती, एक लायटर आणि दारुची बाटली सापडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना घडली तेव्हा त्या लिविंग रुममध्ये आपल्या आईसोबत बोलत होत्या. डेस्टिनीचा आवाज ऐकून त्यांनी बाथरुमकडे धाव घेतली असता त्यांना दिसली की याठिकाणी आग लागली आहे. या मुलीसोबतच बाथरुममधील इतर वस्तूंनीदेखील पेट घेतला होता. यानंतर त्यांनी ही आग विझवली. डेस्टिनीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यातआ आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात