मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बोको हरामचा दहशतवादी शेकऊची आत्महत्या, 300 शाळकरी मुलींच्या अपहरणामुळे होता चर्चेत

बोको हरामचा दहशतवादी शेकऊची आत्महत्या, 300 शाळकरी मुलींच्या अपहरणामुळे होता चर्चेत

बोको हरामचा प्रमुख अबुबकर शेकाऊ यानं आत्महत्या केली आहे. इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP) या शत्रू संघटनेसोबत झालेल्या चकमकीदरम्यान त्याने स्वत: ला स्फोटानं उडवलं (Abubakar Shekau News) आहे.

बोको हरामचा प्रमुख अबुबकर शेकाऊ यानं आत्महत्या केली आहे. इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP) या शत्रू संघटनेसोबत झालेल्या चकमकीदरम्यान त्याने स्वत: ला स्फोटानं उडवलं (Abubakar Shekau News) आहे.

बोको हरामचा प्रमुख अबुबकर शेकाऊ यानं आत्महत्या केली आहे. इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP) या शत्रू संघटनेसोबत झालेल्या चकमकीदरम्यान त्याने स्वत: ला स्फोटानं उडवलं (Abubakar Shekau News) आहे.

नवी दिल्ली 07 जून : दहशतवादी संघटना बोको हरामचा दहशतवादी अबुबकर शेकऊ यानं आत्महत्या केली आहे. इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP) या शत्रू संघटनेसोबत झालेल्या चकमकीदरम्यान त्याने स्वत: ला स्फोटकानं उडवलं (Abubakar Shekau News) आहे. वृत्तसंस्था एएफपीने ISWAP च्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. याआधी दोन आठवड्यांपूर्वीही त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. मात्र, त्यावेळी या घटनेची अधिकृत माहिती मिळाली नव्हती. मात्र, यावेळी इस्लामिक स्टेटनं एक ऑडिओ रेकॉर्डिंग जारी केली आहे.

यात आयएसडब्लूएपीचा नेता अबू मुसाब अल-बारनवी (Abu Musab Al-Barnawi) म्हणतं आहे, की 'शेकऊनं जमिनीवर अपमानित होण्यापेक्षा यानंतर अपमानित होणं योग्य समजलं आहे. त्यानं स्वतःला बॉम्बनं उडवलं आहे'. मात्र, बोको हरामनं अद्याप शेकऊच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केलेली नाही. बोको हरामनं नायजेरिया आणि आफ्रिकेच्या इतर भागांमध्ये दहशत पसरवली आहे तसंच अनेकांची हत्याही केली आहे.

नायजेरियाच्या सैन्याचं म्हणणं आहे, की याप्रकरणी ते आणखी तपास करत आहेत. ऑडिओमध्ये आयएसडब्लूएपीनं सांगितलं, की कशाप्रकारे संबीसाच्या जंगलात बोको हरामच्या ठिकाणांपर्यंत लढाऊ पाठवले. यावेळी शेकऊ आपल्या घरात बसलेला होता. यानंतर शेकऊनं इथून पळ काढला. नंतर झुडपांमध्ये तो आढळून आल्यावर त्याला आणि त्याच्या साथीदारांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आलं. मात्र, शेकऊनं असं करण्यास नकार दिला आणि स्वतःला बॉम्बनं उडवून घेतलं. बोके हरामची स्थापना 2002 मध्ये मोहम्मद यूसुफनं केली होती. 2009 मध्ये त्यांनी इस्लामिक देशाची स्थापना करण्यासाठी हिंसक पद्धतीचा अवलंब करण्यास सुरूवात केली. अमेरिकेनं 2013 मध्ये याला दहशतवादी संघटना घोषित केलं.

अबुबकर शेकऊ तेव्हा चर्चेत आला जेव्हा 2014 मध्ये एकसोबतच 300 मुलींचं शाळेतून अपहरण केलं होतं. त्याला अनेकदा मृत घोषित केलं गेलं आहे, मात्र मृत्यूची अधिकृत घोषणा आता केली गेली आहे. देशाचं सैन्यही या दहशतवादी संघटनेसोबत लढण्याासाठी त्यांच्या अड्ड्यावर हवाई हल्ले करत असतं. या संघटनेसोबत जोडल्या गेलेल्या अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बोको हरामच्या 40 हजारहून अधिकांना मारलं गेलं आहे. तर, या दहशतवादापासून वाचण्यासाठी 20 लाखा लोकांना विस्थापित व्हावं लागलं आहे.

First published:

Tags: Crime news, Suicide, Terrorist