राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 06 जून : जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताचे नाते जीवावर उठल्याची धक्कादायक घटना बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घडली आहे. शेतीच्या वादातून पुतण्याने आपल्या काकाच्या (Uncle ) डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना खामगाव तालुक्यातील आकोली शिवारात रविवारी दुपारी घडली. रमेश नरिभाऊ तिडके (वय-70) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ‘‘कोविडला आमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही’’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रमेश तिडके हे तालुक्यातील अटाळी येथील रहिवासी आहेत. याबाबत हिवरखेड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पुतण्या पंकज सुरेश तिडके (वय-35) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश तिडके यांची तालुक्यातील आकोली शिवारात शेती आहे. गेल्या काही दिवसांपासून काका रमेश आणि पुतण्या पंकज तिडके या दोघांमध्ये शेतीवरून वाद पेटला होता. हा वाद पुढे पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. काका-पुतण्यांनी परस्परविरोधी तक्रारीही खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात केल्या आहेत. Nagpur Unlock : नागपूरमध्ये नियमावलीत बदल, दुकानं 5 तर बार वाजेपर्यंत सुरू! परंतु, रविवारी रमेश तिडके हे आपल्या शेतात काम करत होते. त्याच वेळी आरोपी पुतण्या पंकज तिथे पोहोचला. दोघांमध्ये जमिनीवरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पंकजने रमेश यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसल्यामुळे त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे ठाणेदार ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी मृतकाच्या मुलाच्या बयाणावरून फिर्याद नोंदवण्यात आली आहे. मुलाच्या तक्रारीवरून आरोपी पंकजविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.