Capitol Hill Violence: ट्रम्प यांच्यावर ऐतिहासिक ‘सोशल कारवाई’ कशी झाली? ट्विटर, फेसबुक आणि YouTube ने टाकलं वाळीत

अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीला ब्लॉक करून एक ऐतिहासिक पाऊस सोशल मीडिया कंपन्यांनी उचललं आहे. ट्रम्प विरुद्ध सोशल मीडिया या युद्धाबद्दल सर्व काही...

अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीला ब्लॉक करून एक ऐतिहासिक पाऊस सोशल मीडिया कंपन्यांनी उचललं आहे. ट्रम्प विरुद्ध सोशल मीडिया या युद्धाबद्दल सर्व काही...

  • Share this:
    वॉशिंग्टन, 7 जानेवारी: अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी अमेरिकेची संसद अर्थात कॅपिटॉल हिल (Capitol Hill violence) इमारतीमध्ये घुसून हिंसात्मक आंदोलन (Violence) केलं. त्यानंतर ट्विटरने (Twitter blocks Trump) डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाउंट ब्लॉक (Block) करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं. त्यापाठोपाठ फेसबुकनेही (Facebook) तसंच केलं. ट्रम्प विरुद्ध सोशल मीडिया कंपन्या हे युद्ध इथपर्यंत कसं पोहोचलं, हे जाणून घेऊ या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी अलीकडेच झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांची हार झाली आहे; मात्र त्याबद्दल त्यांनी पहिल्या दिवसापासूनच शंका उत्पन्न केली असून, घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण वक्तव्यांमुळे समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हिंसात्मक आंदोलन केलं. ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे या हिंसेचं समर्थन केलं. त्याचा परिणाम म्हणून ट्विटरने ट्रम्प यांच्या अकाउंटवरून केली गेलेली ट्विट्स तर हटवलीच; पण 12 तासांसाठी त्यांचं ट्विटर अकाउंट बंदही ठेवलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांचं फेसबुक आणि यू-ट्यूब अकाउंटही बंद करण्यात आलं. सोशल मीडिया कंपन्या आणि ट्रम्प यांच्यात संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ नाही; मात्र त्यांचं अकाउंट बंद ठेवलं जाण्याची नामुष्की मात्र पहिल्यांदाच ओढवली आहे. यापूर्वी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळीही ट्विटरने ट्रम्प यांची ट्विट्स हटवण्याची कारवाई केली होती. ट्रम्प कायमच सोशल मीडिया वेबसाइट्सच्या विरोधात राहिले आहेत आणि या वेबसाइट्स उद्ध्वस्त करण्याची भाषा बोलत आले आहेत. ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विट्सवर पूर्वी कारवाई केली होती. फेसबुक मात्र त्या भानगडीत पडलं नव्हतं. आता मात्र ट्विटरसह फेसबुक, यू-ट्यूब यांनीही ट्रम्प यांच्या अकाउंट्सवर कारवाई केली आहे. सोशल मीडिया कंपन्या विरुद्ध ट्रम्प हे युद्ध नेमकं आहे तरी कसं? टपाली मतदान टपाली मतदानाच्या माध्यमातून डेमोक्रॅटिक पक्ष मतदारांचा घोटाळा करण्याचा प्रयत्न करतो आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या वेळी केला होता. आपला मुद्दा मांडण्यासाठी आणि वस्तुस्थितीबद्दल भ्रम निर्माण करण्यासाठी ट्रम्प यांनी त्या वेळी एकापाठोपाठ एक अशी अनेक ट्विट्स केली होती. त्या वेळी ट्विटरने पहिल्यांदाच ट्रम्प यांच्यावर शिस्तीसाठी कारवाई केली. फॅक्ट चेक पॉलिसीचा अवलंब करून, ट्रम्प यांची ट्विट्स खोटी माहिती देत असल्याचं ट्विटरने सांगितलं. त्या ट्विट्सवर 'फेक अलर्ट'ची (Fake Alert) सूचना देण्यात आली, जेणेकरून ट्विटरच्या युझर्सची दिशाभूल होऊ नये. कोणत्याही सोशल मीडिया वेबसाइटने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. कडक सॅल्युट! यासाठी खर्च करतो हा कॉन्स्टेबल आपली सगळी कमाई, वाचून थक्क व्हाल यावर ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्विटर हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीबद्दल भ्रम उत्पन्न करणाऱ्या ट्विट्सना रोखण्यासाठी आपण ही कारवाई केल्याचं स्पष्टीकरण ट्विटरने त्यावर दिलं होतं. ट्रम्प प्रशासनाने मात्र ट्विटरकडून ट्रम्प यांच्याबाबत पक्षपात होत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी एक प्रकारे ट्विटरविरोधात मोर्चाच उघडला होता; मात्र आपल्या तत्त्वांवर ठाम राहण्याची भूमिका ट्विटरने घेतली होती. दुसऱ्या बाजूला, ट्विटरचे प्रमुख योएल रोथ यांनी ट्रम्प यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेच्या ट्विट्सवरूनही ट्रम्प आणि ट्विटर कंपनी यांच्यात तणावपूर्ण वातावरण तयार झालं होतं. वांशिक वाद त्यानंतर अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड (George Floyd) नावाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं प्रकरण घडलं. त्या वेळी भडकलेल्या हिंसाचारादरम्यान ट्रम्प यांनी दडपशाहीचं धोरण अवलंबून तशा आशयाची ट्विट्स केली होती. फ्लॉइड प्रकरणावर नाराजी व्यक्त करणारी आंदोलनं पोलिस बळाचा वापर करून चिरडून टाकण्याची भाषा करण्यात आली होती. ही ट्विट्स हिंसेचं समर्थन करणारी असल्याचं ट्विटरकडून ग्राह्य धरण्यात आलं. काय म्हणताय! 'चलते चलते' मिळणार वीज; रस्त्यावर फक्त चालण्याने ऊर्जा निर्मिती 'ते लुटत असतील, तर आम्ही शूट करू' अशा आशयाची ट्विट्स ट्रम्प यांनी केली होती. दोनच तासांच्या आत ट्विटरने त्यावर वॉर्निंग लेबल्स अर्थात इशारा देणारी लेबल्स दाखवायला सुरुवात केली. हिंसा उडकवणारी किंवा हिंसेचं समर्थन करणारी वक्तव्यं किंवा कृती यांचं समर्थन ट्विटर करत नाही, अशी सूचना ट्रम्प यांच्या ट्विट्सखाली दिसत होती. ट्रम्प यांची अशी ट्विट्स रिट्विट आणि लाइक करणाऱ्यांनाही ट्विटरने ब्लॉक केलं होतं. ट्रम्प यांचं असं ट्विट व्हाइट हाउसच्या अकाउंटवरून रिट्विट झालं, तेव्हा त्याखालीही ट्विटरने वॉर्निंग लेबल दर्शवायला सुरुवात केली. पुन्हा झालेल्या या शिस्तभंगाच्या कारवाईनंतर नाराज झालेल्या ट्रम्प यांनी ट्विटरविरोधात कडक धोरण अवलंबण्याचा आणि सेक्शन 230 रद्द करण्याचा धमकीवजा इशारा दिला होता. वाद थांबलेच नाहीत ट्विटरविरोधात ट्रम्प यांचं सुरू असलेले हे वाद जवळपास वर्षभर सुरूच होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांच्या 14 ट्विट्समधील माहिती भ्रम पसरवणारी असल्याचं सांगून ट्विटरने ती फ्लॅग केली होती. त्याच वेळी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा ज्वर ऐन बहरात होता. ट्विटरने आपली शिस्तीची भूमिका कायम राखली होती. त्याच वेळी फेसबुकनेही अशा तऱ्हेची कारवाई करावी, असा दबाव वाढत होता; मात्र फेसबुक त्यापासून लांबच राहिलं होतं. छोटी गुंतवणूक मोठा फायदा : LIC NPS फंडामध्ये मिळतोय सर्वात जास्त फायदा फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी आपली कंपनी अशा प्रकरणांपासून दूर असल्याची भूमिका टीव्हीवरही मांडली होती. सत्य या गोष्टीवरून इंटरनेटच्या व्यासपीठावर कोणी मध्यस्थ असण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका झुकेरबर्ग यांनी मांडली होती. मात्र वस्तुस्थिती तपासण्याच्या (Fact Check) नैतिक जबाबदारीपासून दूर पळण्याच्या धोरणामुळे फेसबुकवर टीका होत होती. ताज्या वादाबद्दल बोलायचं झालं, तर कॅपिटॉल हिलच्या हिंसेचं समर्थन करण्याच्या ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे ट्विटरने त्यांचं अकाउंट 12 तासांसाठी बंद केलं आणि ते अकाउंट कायमसाठीही बंद केलं जाऊ शकतं, असा इशाराही ट्विटरने दिला. त्यानंतर फेसबुक आणि यू-ट्यूबनेही ट्रम्प यांच्याविरोधात शिस्तभंगाची पहिली कारवाई केली आणि त्यांच्या अकाउंटवरून वादग्रस्त व्हिडिओ, पोस्ट्स हटवल्या. फेसबुकने नियमभंग झाल्याच्या कारणावरून ट्रम्प यांचं अकाउंट 24 तासांसाठी ब्लॉक केलं.
    First published: