जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कडक सॅल्युट! यासाठी खर्च करतो हा कॉन्स्टेबल आपली सगळी कमाई, वाचून थक्क व्हाल

कडक सॅल्युट! यासाठी खर्च करतो हा कॉन्स्टेबल आपली सगळी कमाई, वाचून थक्क व्हाल

कडक सॅल्युट! यासाठी खर्च करतो हा कॉन्स्टेबल आपली सगळी कमाई, वाचून थक्क व्हाल

एखाद्या संवेदनशील माणसानं भावनिक होत दाखवलेली माणुसकी कुणाचं आयुष्यच बदलू शकते. असंच एक सुखद वास्तव पोलीस दलातून समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 जानेवारी : या जगात अनेक वाईट, क्रूर आणि हिंसक घटना सातत्यानं समोर येत असल्या तरी काही चांगली माणसं अजून नक्कीच आहेत. त्यांच्याच बळावर हे जग सुरू आहे. आपापल्या कुवतीप्रमाणं ही माणसं अनाथ-वंचित व्यक्तींना मदतीचा हात देत असतात. विशेषतः कोरोना लॉकडाउनच्या काळात असे अनेक व्हीडिओ आणि फोटोज समोर आले. अगदी पोलिसांमधील माणुसकीचंही (humanity) अनेकदा दर्शन घडलं. असाच एक पोलीस कर्मचारी (police) आहे अमित लाठीया. हा हरियाणाच्या सोनिपतचा (Hariyana Sonipat) राहणारा आहे. अमित मागच्या 7 वर्षांपासून गरीब आणि अनाथ (poor and orphan) मुलांना नौकरीसाठी तयार करण्याचं काम करत आहेत. लोक त्यांना अक्षरश: देवदूत मानतात. अमित हे 2010 साली दिल्ली पोलिस दलात कॉन्स्टेबल (police constable) म्हणून रुजू झाले. ते सांगतात, ‘मी लहानपणी खूप अडचणींचा सामना केला. अगदी शिक्षणासाठीही पैसे नसायचे. मग अर्धवेळ नोकऱ्या करायचो. देशसेवा करण्याची इच्छा तेव्हापासूनच होती. मग पोलीसभर्तीची तयारी केली. दिल्ली पोलिसात रुजू होण्याआधी चंडीगढ पोलिस दलातही माझी निवड झाली होती. समाजकार्याची सुरवात अमित यांनी एका प्रसंगातून केली. अमित एकदा सोनिपतमध्ये एका रिक्षामध्ये बसले होते. हा रिक्षा 17 ते 18 वर्षांचा एक पोरगा चालवत होता. अमित यांनी याआधीही त्याला पाहिलं होतं. त्याच्याशी बोलल्यावर अमित यांना कळालं, की तो बारावीपर्यंत शिकला आहे. आता मात्र शिक्षण सोडून हलाखीच्या परिस्थितीमुळं तो रिक्षा चालवतो. मुलाचं नाव होतं विनय. आता विनय अमितच्या आधार आणि मार्गदर्शनामुळं हरियाणा पोलीस दलात पोचलाय आणि चांगलं काम करतो आहे. विनयसोबतच अमित यांनी अरुण आणि संजीत अशा यादों अनाथ मुलांचीही जबाबदारी घेतली. हळूहळू अशीच एकूण 100 मुलं त्यांच्या छत्रछायेत शिकू लागली. आता अत्यांतील तब्बल 30 मुलांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. सध्याही अमित 25 मुलांना शिकवत आहेत. या मुलांसाठे त्यांनी सोनिपत इथं घरही भाड्यानं घेतलं आहे. अमित आपला सगळा पगार या मुलांवर खर्च करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Salary
  • First Published :
जाहिरात
जाहिरात