Home /News /money /

छोटी गुंतवणूक मोठा फायदा : LIC NPS फंडामध्ये मिळतोय सर्वात जास्त फायदा

छोटी गुंतवणूक मोठा फायदा : LIC NPS फंडामध्ये मिळतोय सर्वात जास्त फायदा

गेल्या तीन वर्षांत 7 पेन्शन फंड मॅनेजर्सनी 11.01 टक्के ते 13.5 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. एलआयसी पेन्शन फंड आपल्या लक्षणीय कामगिरीमुळे टीअर टू सेगमेंटमध्ये आपलं पहिलं स्थान कायम राखून आहे

    मुंबई, 07 जानेवारी : गेल्या तीन वर्षात सरकारी सिक्युरिटी फंडांमध्ये नॅशनल पेन्शन सिस्टीम योजनांनी दुहेरी अंकातील परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत 7 पेन्शन फंड मॅनेजर्सनी 11.01 टक्के ते 13.5 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सीसीआयएल सॉव्हरिन बाँड आणि दहा वर्ष मुदतीच्या गिल्ड म्युच्युअल फंडानीदेखील 10.78 टक्के परतावा दिला आहे. एलआयसी पेन्शन फंड पहिल्या स्थानावर कायम एलआयसी पेन्शन फंड आपल्या लक्षणीय कामगिरीमुळे टीअर टू सेगमेंटमध्ये आपलं पहिलं स्थान कायम राखून आहे. तीन वर्षात या फंडाने 13.5 टक्के परतावा दिला आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीवरून याची माहिती मिळते. एलआयसी पेन्शन फंडाच्या आसापास एचडीएफसी पेन्शन फंडानं स्थान मिळवलं आहे. एचडीएफसी फंडानं 11.7 टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांच्या मुदतीचा विचार केला तर एलआयसी पेन्शन फंडानं सर्वात जास्त परतावा दिला आहे. या कालवधीत या फंडानं 11.88 टक्के परतावा दिला आहे. या आधारावर एनपीएस फंड आणि म्युच्युअल फंडांपेक्षा सरस कामगिरी करत एलआयसी पेन्शन फंड अव्वल स्थानावर आहे. एनपीएस टियर -2 अकाउंटच का ? 60 व्या वर्षी मुदत पूर्तता होणारे रिटायरमेंट अकाउंटस एनपीएस योजनांना टियर एकपेक्षा टियर 2 विभागात अधिक सवलती आहेत. या गुंतवणुकीतून तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेळी पैसे काढू शकता. सरकारी कर्मचारी वगळता टियर 2 अकाउंटसवर इन्कम टॅक्सच्या कलम 80 सी अंतर्गत कोणतीही सवलत मिळत नाही. पुढील वर्षी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीद्वारा नवीन पेन्शन फंड मॅनेजर्स नियुक्त केले जातील तेव्हाही याचे नियम असेच राहतील. इक्विटी स्कीम्ससाठी 0.09 टक्के कमाल गुंतवणूक व्यवस्थापन शुल्क आणि 0.03 टक्के इंटरमीडीयरिज शुल्कासह येणारे म्युच्युअल फंड आणि अन्य गुंतवणूक साधनांचा विचार करता एनपीएस सर्वात स्वस्त पर्याय आहे. कशी करावी गुंतवणूक ? टियर टू अकाउंटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी टियर एक अकाउंट उघडणं आवश्यक आहे. नवीन खातं किमान एक हजार रुपये भरून उघडता येतं. यामध्ये किमान 250 रुपये भरत राहणं आवश्यक आहे. अर्थात हे व्हॉलंटरी खातं असल्यानं यात दरवर्षी गुंतवणूक करणं गरजेचं नाही. सात वर्षात कोणत्याही एका फंड मॅनेजर्सची तुम्ही निवड करू शकता. टियर एक साठी तुम्ही ज्या फंड मॅनेजर्सची निवड केली आहे, टियर टूसाठी पण तोच फंड मॅनेजर असणं आवश्यक नाही. टियर एकमधील गुंतवणूकीला असणारे नियम  टियर दोनसाठी लागू आहेत. 50 व्या वर्षी ग्राहकांना इक्विटी अॅसेट क्लासमध्ये 75 टक्के एक्स्पोजर मिळेल. तुमच्या गुंतवणुकीचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही ऑटो चॉईस गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Income tax, Pension funds

    पुढील बातम्या