जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काय म्हणताय! 'चलते चलते' मिळणार वीज; रस्त्यावर फक्त चालण्याने ऊर्जा निर्मिती

काय म्हणताय! 'चलते चलते' मिळणार वीज; रस्त्यावर फक्त चालण्याने ऊर्जा निर्मिती

काय म्हणताय! 'चलते चलते' मिळणार वीज; रस्त्यावर फक्त चालण्याने ऊर्जा निर्मिती

ज्या रस्त्यावर (road) चालून किंवा धावून तुम्ही तुमच्या कॅलरीज घटवता तोच रस्ता आता ऊर्जा निर्मिती करून तुम्हाला वीज (electricity) देऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनाली, 07 जानेवारी : सूर्य, पाणी, वारा या नैसर्गिक घटकांपासून ऊर्जा निर्मिती होऊन वीज मिळते, हे आपल्याला माहिती आहे. पण कधी रस्त्यापासून वीज निर्मिती (electricity) होते असं कधी ऐकलं आहे का? हो बरोबर वाचलंत. रस्त्यापासून वीज. ज्या रस्त्यावर चालून किंवा धावून तुम्ही तुमची ऊर्जा घटवता तोच रस्ता आता ऊर्जा निर्मिती करून तुम्हाला वीज देऊ शकतो. भारतीय शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखवलं आहे. हिमाचल प्रदेशमधल्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉडी मंडीच्या (IIT Mandi) शास्त्रज्ञानं असा रस्ता तयार केला आहे, जो वीज निर्मिती करतो. आयआयटी मंडीच्या या शास्त्रज्ञांनी अशा पद्धतीनं रस्ता तयार केला आहे, ज्यावर दाब पडल्यानंतर ऊर्जेची निर्मिती होते. शास्त्रज्ञांनी ग्रेडेग पोलिंग तंत्रज्ञान आणि पीजोइलेक्ट्रिक मटेरियलच्या मदतीनं सॅम्पल रस्ते बनवले आहेत. हा रस्ता तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमचं नेतृत्व करणारे डॉ. राहुल वैश यांनी सांगितलं की, त्यांनी हा रस्ता तयार करण्यासाठी  पीजोइलेक्ट्रिक मटेरियल (Piezoelectric Material) वापरलं. यामुळे मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतरित होते, असं वृत्त इंडिया टाइम्स नं दिलं आहे. रस्त्यावर पडणारा दबाव, ताण, होणारं घर्षण, याला मेकॅनिकल दबाव म्हटलं जातं. रस्त्याच्या खाली आणि वर पीजोइलेक्ट्रिक कँटीलीवर बीम्स लावण्यात आले आहेत. यावरील मेकॅनिकल दबाव म्हणजे रस्त्यावर पडणारा दाब, होणार घर्षण यामुळे मेकॅनिकल ऊर्जेची निर्मिती होते आणि ती इलेक्ट्रिकल ऊर्जेमध्ये बदलते. सध्या यापासून निर्माण होणारी ऊर्जा खूप कमी आहे, त्यामुळे मटेरिअलची शक्ती आणि ऊर्जेची मात्रा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असंही त्यांनी सांगितलं. या अभ्यासाचे परिणाम सकारात्मक आहेत. आता सामान्य परिस्थितीत असे रस्ते काम करू शकतात आता हे पाहणं गरजेचं आहे.  ऊन, पाऊल, दबाव, घर्षण अशी परिस्थिती हे रस्ते कितपत झेलू शकतात हे पाहावं लागेल.असेच रस्ते मोठ्या प्रमाणात बनवण्यात आले तर ऊर्जेची मोठी समस्या संपू शकते, असा विश्वास IIT Mandi च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात