Home /News /videsh /

ही अमेरिकन कंपनी देणार 1 लाख लोकांना जॉब ऑफर! अट एकच - मंगळावर जाण्याची तयारी हवी

ही अमेरिकन कंपनी देणार 1 लाख लोकांना जॉब ऑफर! अट एकच - मंगळावर जाण्याची तयारी हवी

मंगळग्रहावरील यात्रेसाठी दरवर्षी 100 स्टारशिप तयार करण्यात येणार असल्याची घोषणा SpaceXचे मालक एलन मस्क यांनी केली आहे. या स्टारशिपच्या माध्यमातून 1 लाख लोकांना मंगळग्रहावर नेण्यात येणार आहे. तसेच त्यांना नोकरी देण्यात येणार आहे.

    वॉशिंग्टन, 21 जानेवारी:  विज्ञान विशेषतः अंतराळ विज्ञानाची आवड असणाऱ्या लोकांना मंगळ ग्रहाविषयी विशेष उत्सुकता असते. मंगळावरच्या जीवसृष्टीची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. वैज्ञानिकांनीही पृथ्वीच्या व्यतिरिक्त मंगळ ग्रहावर जीवन असल्याचा दावा केलेला आहे. एकदा नव्हे तर अनेकदा वैज्ञानिकांनी मंगळवर जीवन असल्याचा दावा केला आहे. मात्र अजूनही पूर्णपणे याची खात्री झालेली नाही. पण आता अमेरिकेतील एक बडी कंपनी थेट एक लाख लोकांना मंगळ यात्रेसाठी नेण्याची तयारी करत आहे. अमेरिकेतील उद्योगपती एलन मस्कची कंपनी SpaceX पुढील 30 वर्षांत तब्बल एक लाख लोकांना अवकाशात पाठवणार आहे. एवढंच नाही तर एक लाख लोकांना मंगळावर नोकरी देण्याची ऑफरही देण्यात येणार आहे.  लोकांना अवकाशात फिरण्यासाठी कर्जही देण्यात येणार आहे. 1 लाख लोकांना मंगळग्रहावर नोकरी एलन मस्क हे अमेरिकेतील 1 लाख लोकांना मंगळग्रहावर नेणार आहे. तशी घोषणाचं त्यांनी केली आहे. त्यामुळं मंगळावर जाण्यासाठी अनेक अमेरिकेतील लोक उत्सुक आहे. एवढंच नाही मंगळावर गेलेल्या 1 लाख लोकांना एलन मस्क नोकरीची ऑफर देणार आहे.  मंगळग्रहाची यात्रा तर करायलाच मिळणार आहे शिवाय नोकरीही मिळणार असल्यानं अमेरिकेतील लोक आनंदी आहे. नोकरी देण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेतील 1 लाख भाग्यवान लोक कोण होणार हे आता पाहावं लागणार आहे. प्रत्येक वर्षी 100 स्टारशिप तयार होणार पुढील 30 वर्षात अमेरिकेतील 1 लाख लोकांना मंगळग्रहावर पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षी 100 स्टारशिप तयार करण्यात येणार आहे. त्याची तयारी एलन मस्क यांच्या स्पेएसएक्स कंपनीनं सुरू केली आहे. महिला स्टारशिप डिसेंबर 2021 साली पाठवण्यात येणार आहे. हा स्टारशिप चंद्रावर उतरणार आहे. तीन वर्षानंतर म्हणजे 2024 साली एलन मस्क दुसरं स्टारशिप तयार करणार आहे. त्यामुळं दुसरं स्टारशिप 2024 साली जाणार आहे. एलन मस्क यांचं ट्विटरवर उत्तर प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी यासंदर्भात Twitter वर अनेकांच्या शंकांना उत्तरं दिली आहे. सुरवातील स्टारशिप चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर स्थायी वसाहत निर्माण करण्याची योजना आहे. हेही वाचा - एका लग्नाची गोष्ट! फोटोमागची कहाणी वाचून तुम्हालाही भारतीय असल्याचा वाटेल अभिमान त्यानंतर मंगळग्रहावर वस्ती निर्माण केली जाणार असल्याचं एका ट्विटच्या प्रश्नाचं उत्तर देताना एलन मस्क म्हणाले. दोन लोकांना अंतरिक्षात पाठवलं जाणार मंगळ ग्रहावर कोणतीही योजना करण्याआधी आम्हाला तिथे इंधन आहे का याची माहिती करून घ्यावी लागणार असल्याचं एलन मस्क म्हणाले. त्यासाठी आधी मंगळावर इंधनाची व्यवस्था करावी लागणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं. जर स्टारशिपमधील इंधन संपलं तर तिथूनच इंधन भरून स्पेस यात्रेकरूंना परत पृथ्वीवर पाठवलं जावू शकतं. त्या आधी दोन लोकांना अंतरिक्षात पाठवलं जाणार आहे. पैसे घेऊन दोघांना अंतराळात पाठवलं जाणार आहे. अंतराळात जाणारे हे दोघे पहिले हौशी टूरिस्ट असतील. लोकांना मंगळावर फिरायला पाठवण्यात स्पेसएक्स कंपनी महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचं मस्क म्हणाले. कोण आहेत एलन मस्क? एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. त्यांची संपत्ती जगात सर्वाधिक असल्याची माहिती आहे. अमेरिकेतील लॉस एंन्जेलीस इथं कुटुंबीयांसह एलन मस्क राहतात. त्यांच्याकडे यूएस, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेचं नागरिकत्व आहे. एलन यांनी तीन लग्न केली आहे. त्यांना 5 मुलं आहेत. ---------------------------------- अन्य बातम्या VIDEO डोंगरावरून वाहतोय आगीचा धबधबा! काय आहे VIRAL VIDEO मागचं वास्तव? लग्न सराईत आली हटके ऑफर! पत्नीनेच पतीचे दुसरे लग्न लावून दिल्यास रिसेप्शन FREE VIDEO: गाढवाची स्वारी करणारा पाकिस्तानी अँकर आता झाला महाराजा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Elon musk, Mars

    पुढील बातम्या