जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: गाढवाची स्वारी करणारा पाकिस्तानी अँकर आता झाला राजा, तलवार दाखवून केलं रिपोर्टिंग

VIDEO: गाढवाची स्वारी करणारा पाकिस्तानी अँकर आता झाला राजा, तलवार दाखवून केलं रिपोर्टिंग

VIDEO: गाढवाची स्वारी करणारा पाकिस्तानी अँकर आता झाला राजा, तलवार दाखवून केलं रिपोर्टिंग

काही दिवसांपूर्वी त्यांनी चक्क गाढवावर स्वार होत रिपोर्टिंग केलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामाबाद, 15 जानेवारी : पाकिस्तानमधील न्यूज चॅनेल आणि त्यांचे रिपोर्टर अजब प्रतापामुळे नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर या रिपोर्टरचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असता. रेल्वे स्टेशनवर रिपोर्टिंग करणारे चांद नवाब यांना तर तुम्ही विसरू शकणार नाही. चांद नवाब यांची भूमिका सलमान खानच्या बजरंगी भाईजानमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारली आहे. आता अलीकडे आणखी एक रिपोर्टरचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चांद नवाब यांच्या सारखेच पाकिस्तानमधील अँकर अमीन हफीज (Amin Hafeez) हे लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी चक्क गाढवावर स्वार होत रिपोर्टिंग केलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता अमीन हफीज यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ पाकिस्तानातील एक पत्रकाराने ट्वीट केला आहे. यामध्ये अमीन हफीज हे महाराज झाले आहे. एखाद्या महाराजाचा पेहराव परिधान करून त्यांनी रिपोर्टिंग केलं आहे. व्हिडिओमध्ये अमीन हफीज यांनी राजाचे कपडे घातले आणि डोक्यावर पगडी सुद्धा घातली आहे. ऑन एअर जातात अमीन यांनी तलवार काढून हवेत फिरवली आणि शेवट करताना कॅमेरामॅनचं नाव घेऊन एन्ड पीटूसी दिला. त्यानंतर त्यांनी Geo News साठी हेडलाइन सुद्धा वाचल्यात. जियो न्यूज हे पाकिस्तानमधील प्रतिष्ठित आणि प्रमुख न्यूज चॅनल आहे.

दरम्यान, अमीन हफीज यांचा व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ शेअर करून एका युझरने ‘अमीन हफीज लाहोर फोर्टमध्ये एका शाही लग्नाचं वार्तांकन करत होते. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे.’ तर दुसऱ्या एका युझरने व्हिडिओ शेअर करून कमेंट केली की, ’ हे भारतीय इलेक्ट्रानिक मीडियाचं भविष्य असू शकतं का?’

जाहिरात

अमीन हफीज यांच्या या व्हिडिओवर कोण काय म्हणालं?

जाहिरात

==================================

जाहिरात

==================================

जाहिरात

==================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात