तिरुवअनंतपुरम, 20 जानेवारी : भारताच्या राष्ट्रीय प्रतिज्ञेत आपण सर्वजण म्हणतो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. या प्रतिज्ञेची प्रचिती देणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. केरळमध्ये एका मशिदीत सामाजिक सलोखा जपणारा आणि सर्वधर्म समभाव दाखवून देणारा आगळावेगळा विवाहसोहळा पार पडला. केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यातील कयामकुलम इथं हिंदू जोडप्याचे लग्न मशिदीत हिंदू पद्धतीने लावून देण्यात आलं. अंजु आणि शरत या दोघांच्या विवाहाचा फोटो व्हायरल होत आहे. कयामकुलम इथल्या अंजुच्या लग्नाचा खर्च तिच्या आईला करणे शक्य नव्हतं. तेव्हा मशिदीच्या समितीने पुढाकार घेऊन तिचे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला. अंजुच्या घरची परिस्थिती बिकट होती. तिच्या आईने मिशिदीच्या समितीकडे लग्नाच्या खर्चाची अडचण बोलून दाखवली. तेव्हा मशिदीकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला. अंजु आणि शरत यांचे लग्न रविवारी पार पडले. विशेष म्हणजे हा सोहळा मशिदीच्या परिसरातच झाला. हिंदू रिती-रिवाजानुसार दोघेही लग्नबंधनात अडकले. मशिदीच्यावतीने जवळपास एक हजार लोकांना भोजनही देण्यात आलं. एवढंच नाही तर दाम्पत्याला लग्नाची भेट म्हणून सोन्याचं आणि दोन लाख रुपयांची रोख रक्कमही भेट म्हणून दिली.
An example of unity from Kerala.
— Pinarayi Vijayan (@pinarayivijayan) January 19, 2020
The Cheravally Muslim Jamat Mosque hosted a Hindu wedding of Asha & Sharath. The Mosque came to their help after Asha's mother sought help from them.
Congratulations to the newlyweds, families, Mosque authorities & the people of Cheravally. pic.twitter.com/nTX7QuBl2a
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन या दाम्पत्याचा फोटो शेअर करत त्यांच्या वैवाहिक जीवनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, केरळने एकतेचं उदाहरण दिलं आहे. चेरुवल्ली जमात कमिटीने हिंदू रितिरिवाजानुसार अंजु आणि शरत यांचे लग्न लावून दिले. या नवविवाहित जोडप्याला, कुटंबाचे आणि मशिदीच्या समितीचे अभिनंदन. भावाच्या लग्नात पूर्ण केली अपुरी इच्छा! अशी लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली नसेल