मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं; 2024 बद्दलही केला मोठा खुलासा 

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं; 2024 बद्दलही केला मोठा खुलासा 

डोनाल्ड ट्रम्प मुलाखतीत म्हणाले, “ भारत देश आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

डोनाल्ड ट्रम्प मुलाखतीत म्हणाले, “ भारत देश आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

डोनाल्ड ट्रम्प मुलाखतीत म्हणाले, “ भारत देश आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : न्यू जर्सी - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असून, ते माणूस म्हणूनही खूपच चांगले आहेत. ते भारतात खूप उत्तम काम करत आहेत,’ अशा शब्दांत अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी मोदींबद्दल (Prime minister Narendra Modi) गौरवोद्गार काढले. अमेरिकेत 2024 मध्ये होणारी राष्ट्रपतिपदाची (Presidential Election) निवडणूक आपण लढवणार असल्याचंही ट्रम्प यांनी या वेळी स्पष्ट केलं.

ते म्हणाले, ‘ रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांनी केलेल्या सर्वेक्षणांत मी लोकप्रिय असल्याची पावती मिळाली आहे. माझ्या लोकप्रियतेतून हे दिसतं की मी पुन्हा निवडणूक लढवावी अशीच अमेरिकी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे मी 2024 मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवेन. त्याबद्दलचा निर्णय मी लवकरच घेईन.’

डोनाल्ड ट्रम्प मुलाखतीत म्हणाले, “ भारत देश आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मोदी माझे मित्र होते. ते व्यक्ती म्हणून खूपच चांगले आहेत. आता ते जे काम भारतात करत आहेत ते करणं कठीण आहे पण ते उत्तम पद्धतीने ते काम करत आहेत. माझ्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अमेरिकी राष्ट्रपतींनी भारताशी इतके चांगले संबंध, मैत्री केली नसेल.”

PM Modi Meets Joe Biden : PM मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन शोधत आले आणि दिला धक्का, व्हिडिओ व्हायरल

एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि माजी राष्ट्रपती बराक ओबामा (Barak Obama) यांच्या काळातील अमेरिकेच्या भारताशी असलेल्या संबंधांपेक्षा माझ्या काळातील संबंध अधिक दृढ होते. यासंबंधी प्रश्नावर ते म्हणाले,‘ खरं तर याबाबत तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला हवा. पण मला वाटत नाही इतर कुठल्या राष्ट्रपतींनी माझ्यापेक्षा चांगले संबंध भारताशी ठेवले असतील.’

अमेरिकी राष्ट्रपतिपदाच्या नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता.

या निकालात घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी तो अमान्य केला होता. त्यानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये घुसून हिंसाचार केला होता. ही अमेरिकेतील हिंसाचाराची ऐतिहासिक घटना ठरली होती. या आधी कधीच कॅपिटल हिलवर असा समर्थकांकडून हल्ला झाला नव्हता. राष्ट्रपती झाल्यानंतर बायडन (Joe Biden) यांनी यावर टीका केली होती आणि अमेरिकेत राजकीय हिंसाचाराला थारा नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

First published:

Tags: America, PM narendra modi, President