वॉशिंग्टन, 05 सप्टेंबर: आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींपासून काही गोष्टी लपवाव्या लागतात. पण ती लपवलेली बाब पुन्हा आपल्या जवळच्या लोकांना सांगणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. पण अमेरिकेतील एका मुलीनं PPT चा वापर करत आपल्या पालकांना सिक्रेट नोकरीबद्दल माहिती दिली आहे. तसेच संबंधित नोकरी कशी सुरक्षित आहे, हेही पटवून दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून मुलीच्या प्रमाणिकपणाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अमेरिकेतील पोर्टलँड येथील रहिवासी असणाऱ्या लेक्स नावाच्या मुलीनं आपण स्ट्रिपर (क्लबमध्ये नग्न होऊन लोकांचं मनोरंजन करणं) असल्याची बाब आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवली होती. पण आपण नेमकी कोणती नोकरी करतो, हे आपल्या जवळच्या व्यक्तींना माहीत असावं या हेतूपोटी लेक्सनं अनोख्या पद्धतीनं आपल्या आई वडिलांना नोकरीबाबत सांगितलं आहे. यासाठी तिने पीपीटीचा वापर केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ लेक्सच्या बहिणीनं आपल्या टिकटॉक अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हेही वाचा-भयंकर! मित्राने कापला मित्राचा Private part; आकारावरून झालेला वाद विकोपाला
या व्हिडीओच्या सुरुवातीला लेक्स आपल्या आई वडिलांना म्हणते की, तुम्ही माझ्या जीवनाबाबत एक मोठं रहस्य जाणणार आहात, पण मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छिते की, यामध्ये कसलाही धोका नाही. यानंतर ती आपल्या पीपीटीला (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) सुरुवात करते. दुसरी स्लाइड ओपन करून ती म्हणते की, 'मी एक स्ट्रिपर आहे. मी एका स्ट्रिप क्लबमध्ये पोल डान्सर आहे आणि हे काम करणं मला आवडतं.' त्याचबरोबर माझी ही नोकरी सुरक्षित असून मला कसलाही धोका नाही, असंही तिने आपल्या आई-वडिलांना समजावून सांगितलं आहे.
हेही वाचा-पत्नी गरोदर राहिल्यानं कंडोम कंपनीकडे केली तक्रार; अधिकाऱ्यांनी ठेवली विचित्र अट
संबंधित व्हिडीओत लेक्सनं सांगितलं की, 'तुम्ही चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ होण्यापूर्वी, मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे माझ्या जीवनाशी संबंधित एक रहस्य आहे. यामुळे कोणाचंही नुकसान होणार नाही. हे मी तुम्हाला सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे, मला माझ्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींना मी काय काम करते, हे माहीत असणं आवश्यक आहे. या व्हिडीओमध्ये लेक्स पुढे म्हणाली की,'या रहस्याचा अर्थ असा आहे की, मी प्रतिभावान आहे, मी कणखर आहे. याचा अर्थ असा नाही की, मी गर्भवती आहे किंवा कोणत्याही धोक्यात आहे.
हेही वाचा-फ्लाइट अटेंडेंटवर भडकली महिला; विमानातच मारहाण करत तोडले दात, Shocking Video
प्रेझेंटेशन संपल्यानंतर, लेक्सनं आपल्या पालकांना विचारलं की, असा कोणता प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला आतापर्यंत मिळालं नाही. यावर तिची आई म्हणाली की, 'मी तुझ्या प्रामाणिकपणावर खूश आहे.' लेक्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.