मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पत्नी गरोदर राहिल्यानं कंडोम कंपनीकडे केली तक्रार; चौकशीआधी अधिकाऱ्यांनी ठेवली विचित्र अट

पत्नी गरोदर राहिल्यानं कंडोम कंपनीकडे केली तक्रार; चौकशीआधी अधिकाऱ्यांनी ठेवली विचित्र अट

प्रतीकात्मक फोटो.

प्रतीकात्मक फोटो.

Wang आणि त्याच्या पत्नीला आधीच दोन मुलं आहेत. त्यांचं आयुष्य अगदी सुखात चाललं होतं आणि त्यांना तिसरं बाळ नको होतं. त्यामुळे, संबंध ठेवताना त्यांनी कंडोमचा वापर करण्याचा निर्णय घेतला

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 04 सप्टेंबर : कंडोमचा वापर करूनही एका व्यक्तीची पत्नी गरोदर (Pregnant) राहिली. जेव्हा त्यानं कंडोम (Condom) बनवणाऱ्या कंपनीच्या विरोधात रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये तक्रार केली तेव्हा त्याच्यासमोर अजब अट ठेवण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्याला म्हटलं, की ते तेव्हाच या प्रकरणाचा तपास करतील जेव्हा संबंधित व्यक्ती त्यांना हे दाखवून देईल, की त्याला कंडोमचा योग्य वापर करणं माहिती आहे.

मॉडर्न इवनिंग टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या (China) Zhejiang येथे राहणाऱ्या Wang आणि त्याच्या पत्नीला आधीच दोन मुलं आहेत. त्यांचं आयुष्य अगदी सुखात चाललं होतं आणि त्यांना तिसरं बाळ नको होतं. त्यामुळे, संबंध ठेवताना त्यांनी कंडोमचा वापर करण्याचा निर्णय घेतला. Wang यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर जेव्हा त्यांनी कंडोम काढलं तेव्हा त्यात एक छेद असल्याचं त्यांना दिसलं. यानंतर पत्नी गर्भवती राहू शकते, अशी शंका आल्यानं त्यांनी लगेचच पत्नीला याबाबत माहिती दिली आणि गर्भनिरोधक गोळीही दिली. मात्र, गोळीही काही काम करू शकली नाही. यानंतर त्यांच्या पत्नीला रोज सकाळी प्रचंड थकवा जाणवू लागला. यामुळे तिला नोकरीही सोडावी लागली.

म्हैस आणि हत्तीची दोस्ती पाहून सगळेच थक्क; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

Wang यांचा असा आरोप आहे, की त्यांच्या आयुष्यात आलेल्या या सर्व समस्यांना कंडोमची खराब क्वालिटीच जबाबदार आहे. त्यांनी याबाबत दुकानदार आणि कंडोम निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे तक्रार केली मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीनं सांगितलं, की कंडोमची क्वालिटी खराब नव्हती. कंपनीनं त्यांना कंडोम आणि गर्भनिरोधक गोळीचे पैसे परत देण्याची ऑफर दिली, मात्र ही त्यांनी नाकारली.

आगीसोबत स्टंट करणं पडलं महागात; अचानक भडका उडाला अन्..., पाहा Shocking Video

कंपनीच्या प्रतिसादामुळे नाराज Wang नं लोकल मार्केट रेग्युलेटरी अथॉरिटीकडे तक्रार केली. त्यांनी अशी मागणी केली, की कंडोमची क्वालिटी तपासली जावी आणि योग्य ती नुकसानभरपाई त्यांना दिली जावी. मिळालेल्या माहितीनुसार, अथॉरिटीनं या व्यक्तीची तक्रार स्विकार केली मात्र त्याच्यासमोर विचित्र अट ठेवली. अथॉरिटीनं म्हटलं की या प्रकरणाचा तपास तेव्हाच केला जाईल, जेव्हा Wang हे सिद्ध करू शकतील की त्यांना कंडोमचा योग्य वापर कसा करायचा हे माहिती आहे. अथॉरिटीचा हा निर्णय ऐकून वांग हैराण झाले. त्यांचं असं म्हणणं आहे, की मी याचा वापर कसा करतो हे कसं दाखवू. अथॉरिटीनं योग्य कारवाई न केल्यास आपण कोर्टात जाऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Pregnant woman, Sexual relationship, Viral news