मॉस्को, 04 सप्टेंबर : मित्र म्हटलं की त्यांच्यामध्ये जितकं प्रेम असते, जितकी मजामस्ती होते, तितकेच वादही होतात. विशेषतः जेव्हा मित्रांमध्ये स्पर्धा लागते आणि त्यांच्यात एक हरतो आणि दुसरा जिंकतो तेव्हा त्यांच्या मैत्रीतही दुरावा येतो. अनेकदा मित्रांमधील हे वाद इतके विकोपाला जातात की ते भयकंर रूप घेतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्रांमधील प्रायव्हेट पार्टवरून वाद (Private part size) झाला आणि तो हिंसक बनला. एकाने दुसऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला (Friend cut other friends private part). रशियाच्या बश्कोर्तोस्तानमधील ही धक्कादायक घटना आहे. दोन मित्रांमध्ये भलतीच स्पर्धा लागली. त्यांनी प्रायव्हेट पार्टच्या आकारावरून स्पर्धा लावली. कुणाचा प्रायव्हेट पार्ट सर्वात लांब आहे, ते पाहू असं म्हणत त्यांनी प्रायव्हेट पार्टचा आकार मोजण्याचं ठरवलं. आता स्पर्धा म्हणजे एका हार आणि एकाची जीत पक्कीच. या स्पर्धेतही एक हरला आणि एक जिंकला. त्यानंतर दोन्ही मित्रांमध्ये वाद झाला.हा वाद इतका विकोपाला गेला की रागात एका मित्राने दुसऱ्या मित्राचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. त्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर कुऱ्हाड मारली. पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली वेदनेने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. हे वाचा - प्रॉस्टेट कॅन्सरपासून वाचवतो सेक्स; वीर्यस्खलनामुळे कमी होतो आजाराचा धोका रिपोर्ट नुसार पोलिसींनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघंही दारू पित होते. नशेत असल्याने त्यांच्यातील वाद हिंसक झाला. वाद संपल्यानंतर एकाने कुऱ्हाड काढून दुसऱ्याच्या डोक्यावर वार केले, त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. ही व्यक्ती गंभीर जखमी झाली, तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.