मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फ्लाइट अटेंडेंटवर भडकली महिला; विमानातच मारहाण करत तोडले दात, पाहा Shocking Video

फ्लाइट अटेंडेंटवर भडकली महिला; विमानातच मारहाण करत तोडले दात, पाहा Shocking Video

महिलेने फ्लाईट अटेंडंटला धक्काबुक्कीही केली. विमानात उपस्थित प्रवाशांनी महिलेच्या या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 04 सप्टेंबर : फ्लाइटमध्ये (Flight) प्रवास करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनेही अनेक नियम बनवले जातात, जे पाळणं आवश्यक असतं. पण काही लोक नियम मोडण्यात पटाईत असतात. असाच एक व्हिडिओ (Shocking Video) अमेरिकेतून समोर आला आहे, ज्यात एक महिला प्रवासी एका फ्लाइट अटेंडंटला मारहाण (Woman Punched Flight Attendant) करताना दिसत आहे.

VIDEO: सेल्फीच्या नादात संकटही नाही दिसलं; बकरीनं महिलेला थेट जमिनीवर आपटलं

डेली स्टारमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्निया (California) येथील महिला व्हीविआना क्विनोनेझ (Vyvianna Quinonez) हिला फ्लाइट अटेंडंटने सीट बेल्ट घालण्यास आणि सीट ट्रे बंद करण्यास सांगितलं. त्यावर ती महिला चिडली आणि तिनं फ्लाइट अटेंडंटशी झटापट सुरू केली. या महिलेने फ्लाईट अटेंडंटला धक्काबुक्कीही केली. विमानात उपस्थित प्रवाशांनी महिलेच्या या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता व्हायरल झाला आहे. घटना साउथवेस्ट एअरलाइन्सची आहे आणि हे विमान सॅक्रॅमेंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सॅन दिएगो आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होतं.

VIDEO : स्टेजवरच नवरदेवासोबत भांडण करून उठून गेली नवरी, पाहा नेमकं काय झालं

महिलेनं फ्लाइटमध्ये आपलं मास्कही व्यवस्थित घातलेलं नव्हतं. तिनं फ्लाइट अटेंडेंला बुक्क्यांनी मारलं, यामुळे तिच्या चेहऱ्यावरही दुखापत झाली. फ्लाइट अटेंडेंटच्या डोळ्यांच्या खाली 4 टाके पडले आणि या भांडणात तिचे दातही तोडले. यानंतर एका प्रवाशात या भांडणात मध्ये पडत फ्लाइट अटेंडेंटचा बचाव केला. मात्र, तोपर्यंत महिलेनं तिला जखमी केलं होतं. या प्रकरणाची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. यानंतर संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी आरोपी महिलेला 20 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

First published:

Tags: Shocking video viral, Travel by flight, Viral video on social media