SMSला रिप्लाय देण्याच्या नादात सोडलं स्टेअरिंग, हवेत उडून नदीत पडली गाडी...पाहा थरारक VIDEO

SMSला रिप्लाय देण्याच्या नादात सोडलं स्टेअरिंग, हवेत उडून नदीत पडली गाडी...पाहा थरारक VIDEO

नजर हटी, दुर्घटना घटी! फोनच्या नादात झाला भयंकर अपघात, थोडक्यात वाचला वाहन चालकाचा जीव.

  • Share this:

बीजिंग, 07 मार्च : नजर हटी दुर्घटना घटी, हे वाक्य नेहमीच आपण ऐकत आलो आहोत. त्यामुळं गाडी चालवताना नजर रस्त्यावर हवी, असे फलक लावलेले असतात. मात्र चीनमध्ये अशाच एका चुकीमुळे एक भयंकर अपघात झाला. चीनमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर दहा मिनिटांनी एका व्यक्तीचा अपघात झाला. ढांग असे या चालकाचे नाव आहे. अपघाताचे फुटेज सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये ही गाडी रेलिंग नसलेल्या पुलावरून जात होती. अचानक गाडी नदीत पडल्याचे दिसत आहे. वाहन चालकाला बाहेर काढल्यानंतर तो गाडी चालवताना मोबाईमध्ये व्यस्त असल्याचे समोर आले आहे. वाहतुक परवाना मिळाल्यानंतर त्याला अनेकांनी अभिनंदनाचे मेसेज येत होते. अशाच मेसेजना उत्तर देत असताना, त्याचा ताबा सुटला आणि गाडी नदीत पडली.

वाचा-अरे देवा! प्रेयसीचा शोध घेण्यासाठी 2000 किलोमीटर वाघाची पायपीट

डेली मेलच्या वृत्तानुसार 21 फेब्रुवारी रोजी चीनच्या झुनी शहरात ही घटना घडली. झुनी ट्रॅफिक पोलिसांनी अपघाताचे फोटो चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेइबोवर शेअर केले आहेत. त्यांनी हा व्हिडीओ अपलोड करताना, कारच्या मालकाला अपघात हा त्याला वाहन परवाना मिळाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत झाला. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेय हा व्हिडिओ मिस्टर हीरो नावाच्या वापरकर्त्याने यूट्यूबवर शेअर केला आहे.

वाचा-आता कुत्रा करणार मतदान! निवडणूक आयोगानं काढलेल्या ओळखपत्राचा Photo Viral

वाचा-महिलेची दादागिरी, हॉर्न वाजवत होता म्हणून बस ड्रायव्हरला केली बेदम मारहाण

फॉक्स न्यूजशी बोलताना झांग यांनी , "मी गाडी चालवत होतो. अचानक माझ्या फोनवर एक अभिनंदनाचा मेसेज आला. मी उत्तर देण्यासाठी फोन उचलताच समोरून दोन लोक येत होते. मी घाबरून गेलो आणि गाडी अचानक त्याने डाव्या बाजूस वळवली”, असे सांगितले.

वाचा-‘खोटं-खोटं तरी रड’ पाठवणीवेळी आईचा नवरीला सल्ला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

सुदैवाने कारचा दरवाजा उघडल्यानंतर झांग यांनी उडी मारली. पोलिसांनी त्याला आणि त्यांची कार क्रेनच्या सहाय्याने नदीतून बाहेर काढण्यात आली. अपघातामुळे झांग यांना खांद्याला दुखापत झाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First published: March 7, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading