मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO : महिलेची दादागिरी, हॉर्न वाजवत होता म्हणून बस ड्रायव्हरला केली बेदम मारहाण

VIDEO : महिलेची दादागिरी, हॉर्न वाजवत होता म्हणून बस ड्रायव्हरला केली बेदम मारहाण

महिला आपली दुचाकी चालवत असताना मागून येणारा बसचालक पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवत होता. मात्र महिला साइड देत नसल्यामुळं बसचालकाने जोरजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली.

  • Published by:  Priyanka Gawde

जामनगर, 05 मार्च : रस्त्यावरून गाडी चालवत असताना अनेकदा विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांचा राग तुम्हालाही येत असेल. मात्र गुजरातच्या जामनगर येथे एक भयंकर प्रकार घडला. बसचालक सतत हॉर्न वाजवत असल्यामुळे एका महिलेने त्याची बेदम मारलं. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिला आपली दुचाकी चालवत असताना मागून येणारा बसचालक पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवत होता. मात्र महिला साइड देत नसल्यामुळं बसचालकाने जोरजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. रागात महिलेने रस्त्याच्या मध्यभागी गाडी थांबवत चालत्या बसमध्ये शिरली. महिलेने बसमध्ये शिरताच बसचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. बसचालकाला मारहाण करताना पाहून काही बघ्यांनी हा व्हिडीओ शूट केला. तर काहींनी या महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला.

वाचा-‘खोटं-खोटं तरी रड’ पाठवणीवेळी आईचा नवरीला सल्ला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

वाचा-VIDEO : ‘सकाळीच चीनहून आलोय’, मेट्रोमध्ये मुलाचं बोलणं ऐकून रिकामी झाली मेट्रो

या व्हिडीओमध्ये ही महिला बसचालकाला अमानुषपणे मारताना दिसत आहे. दरम्यान या महिलेविरोधात अद्याप पोलीस कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-कोरोना सोडा हे त्याहूनही जास्त भयंकर! आरोग्याशी कसा होतोय खेळ, पाहा VIDEO

12वीच्या विद्यार्थ्याने पकडली कंडक्टरची कॉलर

याआधी काही दिवसांपूर्वी पुण्यात एका 12वीच्या विद्यार्थ्याने बस कंडक्टरची कॉलर पकडली होती. आळंदी ते स्वारगेट बसमध्ये हा प्रकार घडला होता. पीएमटी बसमध्ये चालकाच्या बाजूने येण्यास मनाई असते. मागील दाराने बसमध्ये प्रवेश करण्याचा नियम आहे. परंतु, हा मुलगा बसच्या समोरच्या दारातून चढला. वाहकाने त्याला हटकले असता तो त्यांच्याशीच वाद घालायला लागला. हा वाद इतक विकोपाला गेला की, त्याने थेट वाहकाची कॉलर पकडून धरली आणि शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी या मुलांची समजूत काढली पण त्याने त्यांचं काही ऐकलं नाही. अखेर चालकाने पोलीस स्टेशनला बस नेण्याचा निर्णय घेतला. घडलेल्या प्रकाराबद्दल त्याच्या नातेवाईकांनी पीएमटीच्या वाहक आणि चालकाची माफी मागितली. या मुलाची 12 वीची परीक्षा सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्याची समजूत काढून सोडून दिलं.

First published:

Tags: Horns