अरे देवा! प्रेयसीचा शोध घेण्यासाठी 2000 किलोमीटर वाघाची पायपीट

अरे देवा! प्रेयसीचा शोध घेण्यासाठी 2000 किलोमीटर वाघाची पायपीट

सोशल मीडियावर फोटो Viral झाल्यानंतर युझर्सनी टिंडर डेटींग अॅपवर गर्लफ्रेंड शोधावी असा सल्लाही दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 06 मार्च : प्राणी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी कायम सुरक्षित जागा आणि साथीदार शोधात असतात. असाच एक वाघ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वन अधिकारी परवीन कासवान यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. एक वाघ जवळपास 2000 किलोमीटर चालल्याचं कॅप्शन देत त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. त्यांनी हे शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. युझर्सनी या फोटोवर तुफान कमेंट्स केल्या आहेत. नेमका हा फोटो काय आहे आणि या फोटोमागची कहाणी काय आहे जाणून घ्या.

हा ट्वीट केलेला फोटो आहे या वाघाचा आपल्याला हवी तशी वाघीण आणि जागा शोधण्यात मशगुल असलेला वाघ तब्बल 2000 किलोमीटरपर्यंत चालत गेल्याचं वन अधिकारी कासवान यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं कळलं? तर या फोटोसोबत कासवान यांनी एक दुसरा फोटोही अपलोड केला आहे जो सॅटलाईटवरून घेण्यात आला आहे. हा वाघ किती अंतर चालला हे या फोटोतून कळू शकते. हा वाघ दिवसा आराम करायचा आणि रात्री चालत फिरायचा असं कासवान यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एका वाघीणीसाठी एवढं चालणं म्हणजे मुश्कीलच नाही का? त्याला ट्रेस कसं करण्यात आलं असेल? असा लगोलग प्रश्नही आपल्याला पडतो.

कासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2019मध्ये या वाघाला रेडियो-टॅग करण्यात आला होता. हा उपक्रम सर्व वाघांसाठी करण्यात आला. त्यामुळे वाघांची गणना करणं सोयीचं झालं. या रेडिओ टॅगच्या माध्यमातून त्याला ट्रॅक करता येणं सहज शक्य झालं.

कासवान यांनी ट्वीट केल्यानंतर युझर्सनी या फोटोवर भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत.

एक युझरने तर टिंडरवर शोध अशी कमेंट लिहिली आहे. तर दुसरा युझर्स म्हणतो की ह्या वाघाला 2 हजार किमी चालून गर्लफ्रेंड नाही मिळाली आणि आम्ही घरी बसून सोशल मीडियावर शोधत आहोत.

First published: March 6, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या