पश्चिम बंगाल, 05 मार्च : निवडणुका जवळ आल्या की निवडणूक आयोगाचे काम वाढते. सर्वात आधी मतदार ओखळपत्र आणि मतदार यादी तयार करण्याकडे त्यांचा भर असतो. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली. रामनगर खेड्यातील रहिवाशाला निवडणूक आयोगाने चक्क कुत्र्याचा फोटो असलेले मतदार ओळखपत्र दिले. या ओळखपत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार सुनील कर्माकर यांनी मतदार ओळखपत्रात सुधारणा करण्यासाठी अर्ज केला होता आणि जेव्हा त्यांना सुधारित कार्ड मिळाले तेव्हा त्यावर एका कुत्र्याचा फोटो होता. सुनील कर्माकर यांनी, “मला सुधारित कार्ड घेण्यासाठी दुलाल स्मृती शाळेत बोलावण्यात आले आणि मला मतदार ओळखपत्र देण्यात आले. मी फोटो पाहिला तेव्हा मला कळले की त्यावर कुत्र्याचा फोटो होता”, असे सांगितले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी न तपासता ओळखपत्र दिल्यामुळं बीडीओ कार्यालयाने सुनील कर्माकर यांची माफी मागितली.
दरम्यान, हे चित्र आधीपासूनच दुरुस्त केले गेले असून कर्मकार यांना योग्य फोटोसह ओळखपत्र मिळेल, असे खंड विकास अधिकारी (BDO) यांनी म्हटले आहे.
Sunil Karmakar: Y'day I was called at Dulal Smriti School & this voter ID was given to me. I saw the photo. The officer there, signed & gave it to me but he didn't see the photo. This is playing with my dignity. I will go to BDO office & request that this should not happen again" https://t.co/zTn5JwBF3x pic.twitter.com/b7pWIxTIy2
— ANI (@ANI) March 4, 2020
WB: Sunil Karmakar, a resident of Ramnagar village in Murshidabad,says he had applied for a correction in his voter ID&when he received a revised ID,it had a dog's photo instead of his own. BDO says "Photo has already been corrected. He'll get final ID with correct photo."(04.03) pic.twitter.com/c9Ba9uybOP
— ANI (@ANI) March 4, 2020
बीडीओ अधिकाऱ्यांनी, "आमची चूक झाली असेल तर ती दुरुस्त केली जाईल. कुत्र्याच्या फोटोचा प्रश्न आहे की, ऑनलाइन अर्ज भरताना एखाद्याने हे केले असते. फोटो आधीपासूनच दुरुस्त केला गेला आहे", असे सांगितले. दरम्यान या ओळखपत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog