जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ‘खोटं-खोटं तरी रड’ पाठवणीवेळी आईचा नवरीला सल्ला, 30 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला VIDEO

‘खोटं-खोटं तरी रड’ पाठवणीवेळी आईचा नवरीला सल्ला, 30 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला VIDEO

‘खोटं-खोटं तरी रड’ पाठवणीवेळी आईचा नवरीला सल्ला, 30 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला VIDEO

टिकटॉकवर सध्या एका नवराईचा तिच्या पाठवणीच्या वेळचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिला ‘खोटं-खोटं’ तरी रडण्याचा सल्ला तिची आई देत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 मार्च : टिकटॉकवर रोज नवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. झटपट प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल TikTok चा वापर केला जातो. पण टिकटॉकवर कधी कोण प्रसिद्ध होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ इतके प्रसिद्ध होतात की त्यांना सोशल मीडियावर शेअर केले जातात. तुम्ही अनेक लग्नांमध्ये गेला असाल जिथे नववधू माहेर सोडून जाण्याच्या कल्पनेने रडत असते.  सध्या एका नवराईचा तिच्या पाठवणीच्या वेळचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पाठवणीवेळी इतर नववधूंप्रमाणे रडण्याऐवजी हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. (हे वाचा- TikTokवर आलं आणखी एक भयंकर चॅलेंज, दिसायला मजेशीर पण घेऊ शकतो तुमचा जीव ) टिकटॉक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका मुलीची पाठवणी सुरू आहे. त्यावेळी तिची आई खूप रडत असते. मात्र या मुलीच्या डोळ्यात साधं टिपूसही नसतं. त्यावेळी तिला कुणीतरी सांगतं की तिची आई खूप रडते आहे. जेव्हा ती मागे वळून आईकडे पाहते, तेव्हा खूप हसू लागते. तर तिला आई म्हणते की, ‘अगं खोट तरी रड’ आणि या व्हिडीओतील नववधू आईला खोटं रडून देखील दाखवते. यावेळी ती आईला समजावते देखील की, ‘मी जवळच राहते, तु तिथे कधीही येऊ शकतेस.’ आजच्या काळातील नववधू कशी असेल हे या व्हिडीओतून स्पष्ट दिसून येत आहे.

@raashiichanda ##royi nahi dulhan ##MatteInkChallenge ##duet ##foryou ##foryoupage @tiktok @tiktok_india ♬ original sound - Raashii Chanda

जाहिरात

राशी चंदा नावाच्या टिकटॉक युजरने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत 30 लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 3 लाख जणांनी लाईक केला असून 1300 हून अधिक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात