सिडनी, 31 डिसेंबर: न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) 2022 या नव्या वर्षाला (New Year) सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांनी मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं. जगात सर्वात पहिल्यांदा नव्या वर्षांचं स्वागत केलं जातं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात. दरवर्षी जगभरातील सेलिब्रेशनपैकी ऑस्ट्रेलिातील नववर्षाचं स्वागत, हे पूर्ण जगाचं आकर्षण असतं, कारण ते सर्वप्रथम होतं.
#WATCH Australia welcomes the new year 2022 with spectacular fireworks at Sydney Harbour
— ANI (@ANI) December 31, 2021
(Source: Reuters) pic.twitter.com/Y5kPhUqtI6
असं झालं सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर यावेळी मोठी गर्दी जमली होती. मात्र कोरोनाचे निकष पाळत नागरिकांनी उत्साहानं नव्या वर्षाचं स्वागत केलं. न्यूझीलंडमध्येही जल्लोष ऑकलंडच्या स्काय टॉवरवर दरवर्षी नयनरम्य रोषणाई केली जाते. या परिसरात जमलेल्या नागरिकांनी 2021 ला निरोप देत 2022 चं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. विद्युत रोषणाई करून आनंद साजरा करण्यात आला. वाजले की बारा स्काय टॉवरवर लावलेल्या भल्यामोठ्या घड्याळाकडे सर्वांचं लक्ष असतं. दरवर्षी हे घड्याळ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतं. या घड्याळात बारा वाजले की जोरदार आतषबाजी आणि सेलिब्रेशनला सुरुवात होते. हे वाचा- नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या जगभरातील परंपरा पाहून तुम्ही लावाल डोक्याल हात! जगभरात तयारी जगातील प्रत्येक देशात सूर्यास्त आणि सूर्योदय यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पृथ्वीचा जो भाग सूर्यापासून सर्वात अगोदर दूर जातो, तिथं सर्वात लवकर दिवस मावळतो आणि उगवतो. त्यानुसार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात सर्वात अगोदर रात्रीचे बारा वाजत असल्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत तिथं सर्वात आधी केलं जातं.