मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Snowstorm in America : हायवेवर 50 हून अधिक वाहनांची धडक, 3 जणांचा मृत्यू, पाहा खतरनाक VIDEO

Snowstorm in America : हायवेवर 50 हून अधिक वाहनांची धडक, 3 जणांचा मृत्यू, पाहा खतरनाक VIDEO

Pennsylvania Highway Accident Video: बर्फवृष्टीमुळे वाहनचालकांचं नियंत्रण कसं सुटतं, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारची धडक बसल्यानंतर लोक गाड्यांमधून बाहेर पडत आहेत.

Pennsylvania Highway Accident Video: बर्फवृष्टीमुळे वाहनचालकांचं नियंत्रण कसं सुटतं, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारची धडक बसल्यानंतर लोक गाड्यांमधून बाहेर पडत आहेत.

Pennsylvania Highway Accident Video: बर्फवृष्टीमुळे वाहनचालकांचं नियंत्रण कसं सुटतं, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारची धडक बसल्यानंतर लोक गाड्यांमधून बाहेर पडत आहेत.

वॉशिंग्टन, 29 मार्च : अमेरिकेच्या (United States) पेनसिल्व्हेनिया महामार्गावर (Pennsylvania highway) सोमवारी बर्फाच्या वादळामुळं (Snowstorm in America) महामार्गावर एकामागून एक 50 ते 60 वाहनं आदळली. या भीषण अपघातात (horrific accident) आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात पेनसिल्व्हेनियाच्या शुयलकिल काउंटीमध्ये (Schuylkill County) घडला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला असून, त्यात एकामागून एक वाहनं आदळताना दिसत आहेत.

" isDesktop="true" id="684480" >

बर्फवृष्टीमुळे वाहनचालकांचं नियंत्रण कसं सुटतं, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारची धडक बसल्यानंतर लोक गाड्यांमधून बाहेर पडत आहेत.

हे वाचा - एक डॉक्टर असाही! 12 वर्षे तुरुंगवास, स्वत:ची केस लढण्यासाठी कायद्याची डिग्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील दृश्यमानता जवळपास शून्य होती, त्यामुळंच हा अपघात इतका भीषण होता. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुयलकिल कंट्रीमध्ये या महिन्यातील हा दुसरा मोठा अपघात असल्याचं सांगण्यात येत आहे.

अनेक मैल वाहतूक खोळंबली

पेनसिल्व्हेनिया परिवहन विभागाने अपघाताविषयी सविस्तर माहिती पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांकडे पाठवली. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की वाहनांची रांग सुमारे एक मैलपर्यंत वाढली. अतिरिक्त बर्फवृष्टीच्या धोक्यामुळे बचावकार्यात आणखी गुंतागुंत वाढली. ज्यामुळं अधिकाऱ्यांना अनेक तास महामार्ग बंद करावा लागला. वाहनांच्या ढिगाऱ्यामुळं महामार्गावरील अनेक मैल वाहतूक खोळंबली, ज्यामुळे आपत्कालीन कार्य करण्यातही अडचणी येत होत्या. त्यांना ढिगाऱ्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले. सोमवारी दुपारी ट्विटरवर माहिती दिली होती, की इथं 50 ते 60 वाहनांचा अपघात झाला आहे.

First published:

Tags: Accident, America, Storm