जाहिरात
मराठी बातम्या / देश / एक डॉक्टर असाही! 12 वर्षे तुरुंगवास, स्वत:ची केस लढण्यासाठी घेतली कायद्याची डिग्री, 186 पुस्तकंही लिहिली

एक डॉक्टर असाही! 12 वर्षे तुरुंगवास, स्वत:ची केस लढण्यासाठी घेतली कायद्याची डिग्री, 186 पुस्तकंही लिहिली

एक डॉक्टर असाही! 12 वर्षे तुरुंगवास, स्वत:ची केस लढण्यासाठी घेतली कायद्याची डिग्री, 186 पुस्तकंही लिहिली

तुरुंगात असतानाही त्यांनी अनेक शोध लावले.

  • -MIN READ
  • Last Updated :

केरळ, 28 मार्च : देशात असे अनेक डॉक्टर आहेत ज्यांच्या कहाण्या आजही चर्चिल्या जातात. डॉ. एल. प्रकाश हे केरळ (पालघाट) येथील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ. यांनी परदेशात उच्च वैद्यकीय शिक्षण (MCH) घेतले आणि सेवा केली. काही कारणास्तव ते साडे बारा वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात असतानाही त्यांनी अनेक शोध लावले. यापैकी एक प्रकाश पद्धत आहे.

जाहिरात

त्यांनी मेडिकलच्या 17 आणि नॉन मेडिकलच्या 142 पुस्तकं लिहिली. मेडिकलची 27 पुस्तकांचे सहलेखकदेखील आहेत. इंग्रजी, हिंदीशिवाय त्यांचं अनेक भाषांवर प्रभूत्व आहे. डॉक्टर बरीच वर्षे मध्य प्रदेशात राहिले. येथे त्यांनी पैसेही खूप कमावले. त्यांना जादू देखील येते.

हे ही वाचा- कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू; पण अख्खं गाव पोहोचलं रेबिजचं इंजेक्शन घ्यायला, काय आहे प्रकरण?

डॉ. एल प्रकाश आपली कहाणी हसत हसत सांगतात. ते पाटना येथे हाडांच्या विशेषज्ञांच्या संमेलनात सहभागी झाले होते. त्यांनी सांगितलं की, 30 वर्षांपूर्वीही ते पाटन्याला आले होते. यादरम्यान पीएमसीएचमध्ये फॅक्चरच्या सर्जरीचे विविध प्रकार शिकवले होते. यानंतर 2022 मध्ये त्यांना पाटन्यात येण्याची संधी मिळाली.

तुरुंगातही केला कैद्यांवर उपचार… डॉ. प्रकाश म्हणतात की, तुरुंगात असताना त्यांनी उपचार करणं थांबवलं नाही. तेथे साहित्य नव्हते. मात्र तरीही तुरुंगातील कैद्यांवर ते उपचार करीत होते. यादरम्यान त्यांनी अनेक संशोधनही केले. आपली केस लढण्यासाठी त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि स्वत:ची केस स्वत: लढले.

जाहिरात

सुटकेनंतर रुग्णांची गर्दी पाहून उत्साह वाढला… तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बदनामीमुळे कोणी रुग्ण येणार नाही असं त्यांना वाटलं होतं. मात्र क्लिनिकबाहेर रुग्णांची गर्दी पाहून ते हैराण झाले. ओळखीचे आणि नातेवाईकांकडून ते फी घेत नाही. एका महिन्यात चारपेक्षा जास्त शस्त्रक्रियाही करीत नाहीत. देशातूनच नाही तर परदेशातूनही त्यांच्याकडे रुग्ण येतात. त्यांनी सांगितलं की, पूर्वी ते चेन्नईमध्ये प्रॅक्टिस करत होते. नंतर पालघाट येथे स्थलांतरित झाले, कारण त्यांचे 96 वर्षीय वडील येथे राहत होते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात