Home /News /videsh /

UNSC मध्ये रशियाविरोधातील प्रस्तावावर भारताकडून मतदान नाही; अमेरिकेनं दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

UNSC मध्ये रशियाविरोधातील प्रस्तावावर भारताकडून मतदान नाही; अमेरिकेनं दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

युक्रेन संकटाबाबत मंजूर झालेल्या या ठरावात रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धावर राजकीय चर्चा, वाटाघाटी, मध्यस्थी आणि इतर मार्गांनी त्वरित तोडगा काढावा, असं म्हटलं होतं. भारताने या प्रस्तावावर मतदान करण्यापासून स्वतःला दूर ठेवलं.

    नवी दिल्ली 26 मार्च : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) गेल्या 30 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) रशियाविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. भारतासह एकूण 13 देशांनी या प्रस्तावावर मतदान केलेलं नाही. आता शुक्रवारी या प्रकरणी अमेरिकेकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, युक्रेन संकटाबाबत संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची भूमिका आश्चर्यकारक आहे. युक्रेन संकटाबाबत मंजूर झालेल्या या ठरावात रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धावर राजकीय चर्चा, वाटाघाटी, मध्यस्थी आणि इतर मार्गांनी त्वरित तोडगा काढावा, असं म्हटलं होतं. भारताने या प्रस्तावावर मतदान करण्यापासून स्वतःला दूर ठेवलं. शुक्रवारी व्हाईट हाऊसने सांगितलं की युक्रेन संकटावर भारताची भूमिका असमाधानकारक आहे, रशियासोबतचे ऐतिहासिक संबंध पाहता हे अतिशय आश्चर्यकारक आहे. Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात भारताला सर्वात मोठी संधी! शेतकऱ्यांना लागू शकते लॉटरी व्हाईट हाऊस नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलमधील इंडो-पॅसिफिकच्या संचालक मीरा रॅप-हूपर यांनी वॉशिंग्टन स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज इंडियाने आयोजित केलेल्या ऑनलाइन फोरममध्ये सांगितलं की रशियाशी घनिष्ठ संबंध सुरू ठेवण्यासाठी पर्यायांची आवश्यकता आहे. त्यांनी म्हटलं की “मला वाटतं की आपण निश्चितपणे हे मान्य करू आणि सहमत होऊ की संयुक्त राष्ट्रांमध्ये जेव्हा मतदानाचा प्रश्न येतो तेव्हा सध्याच्या संकटावर भारताची भूमिका असमाधानकारक आहे. भारताने अलिकडच्या वर्षांत वॉशिंग्टनशी घनिष्ठ संबंध विकसित केले आहेत. परंतु मॉस्कोशी भारताचे दीर्घकालीन संबंध आहेत, जे देशाच्या संरक्षण उपकरणांचा एक प्रमुख पुरवठादार आहे. Russia-Ukraine War: एका महिन्यानंतर रशिया-युक्रेन युद्धात कोण हरलं आणि कोण जिंकलं? जाणून घ्या सविस्तर भारत आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहेत आणि चीनविरुद्ध क्वाड ग्रुपिंग हा या गटबाजीचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु भारताचे मॉस्कोशी दीर्घकाळचे संबंध आहेत आणि ते भारताच्या संरक्षण उपकरणांचा प्रमुख पुरवठादार राहिले आहेत. युक्रेनमधील रशियन कृत्यांचा निषेध करणं भारताने टाळलं आणि या विषयावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मतदानामध्ये भाग घेतला नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: America, Russia Ukraine

    पुढील बातम्या