Home /News /videsh /

Russia-Ukraine War: एका महिन्यानंतर रशिया-युक्रेन युद्धात कोण हरलं आणि कोण जिंकलं? जाणून घ्या सविस्तर

Russia-Ukraine War: एका महिन्यानंतर रशिया-युक्रेन युद्धात कोण हरलं आणि कोण जिंकलं? जाणून घ्या सविस्तर

युक्रेनमधील लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार हटवण्याचे रशियाचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत आणि हेच सत्य आहे की एक महिना होत आला तरी रशिया युक्रेनवर विजय मिळवू शकलेला नाही.

कीव 25 मार्च : युक्रेन-रशिया युद्ध (Russia Ukraine War) सुरू होऊन आता एक महिना होत आला आहे. अजूनही युद्ध संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. रशियासारख्या (Russia) बलाढ्य देशालाही युक्रेननं (Ukraine) झुंजवत ठेवलं आहे. रशियानं युक्रेनवर 24 फेब्रुवारी 22 रोजी हल्ला सुरु (Russian Attacks on Ukraine) केला. दुसऱ्या महायुद्धानंतर (World War II) युरोपमध्ये होणारं हे सगळ्यांत मोठं युद्ध आहे. खरं तर हे युद्ध आण्विक युद्धामध्ये रुपांतरित होईल अशी भीती होती, ही भीती अजूनही कायम आहे. पण युक्रेननं रशियाला चांगलीच टक्कर दिली आहे. युक्रेनमधील लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार हटवण्याचे रशियाचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत आणि हेच सत्य आहे की एक महिना होत आला तरी रशिया युक्रेनवर विजय मिळवू शकलेला नाही. रशियानं कितीही हल्ले केले तरी युक्रेन झुकलेलं नाही. युद्धामुळे हजारो लोक युक्रेनमधून बाहेर पडले आहेत. मारियुपोलमध्ये मात्र अजूनही 1,00,000 लोक राहत आहेत असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्वेदिमीर झेलेन्स्की (Vlolvedimir Jelensky) यांनी सांगितलं आहे. युद्धाआधी या शहराची लोकसंख्या 4,30,000 इतकी होती. मात्र आकाशातून, जमिनीवरून आणि अगदी समुद्रामार्गेही केलेल्या हल्ल्यांमुळे हे शहर जवळपास उद्धवस्त झालं आहे. इथं राहणाऱ्या लोकांपर्यंत गरजेचं सामान पोहोचवणंही अवघड झालं आहे. Chemical Weapons | रासायनिक शस्त्रे किती धोकादायक? रशिया युक्रेन युद्धात त्यांचा काय परिणाम होईल? अनेक शहरांची अशीच अवस्था असली तरी युक्रेननं माघार घेतलेली नाही. युक्रेनी लष्करानं ‘हिट अँड रन’ या रणनीतीचा अवलंब केला आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या शस्त्रांमुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळेच अजूनही रशियन सैन्याला आता दुरून हल्ला करावा लागत आहे. अजूनही रशियाला युक्रेनची राजधानी किववर ताबा मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्यांचं ध्येय अजूनही साध्य झालेलं नाही. मारियुपोल (Mariupol) खरं तर रशियन हल्ल्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे पण तरीही युक्रेनी सैनिकांनी अजूनही ते रशियाच्या हाती जाऊ दिलेलं नाही. या युद्धात रशिया आणि युक्रेनचे किती सैनिक मारले गेले याची नेमकी माहिती अजूनही कळू शकलेली नाही. पण ही संख्या काही हजारांपर्यंत नक्कीच असू शकते अशी शक्यता आहे. रशियाचं सुमारे 10 टक्के सामरिक नुकसान झाल्याचा अमेरिकेचा अंदाज आहे. रशियाच्या सैन्य, टँक किंवा युद्धासाठी लागणाऱ्या साहित्याचंही बऱ्यापैकी नुकसान झालं आहे. महिन्यानंतरही रशिया युक्रेनमध्ये आतापर्यंत का जिंकला नाही? 5 पॉईंट्समध्ये समजून घ्या आतापर्यंत रशियाच्या 15,000 ट्रूप्सचं नुकसान केल्याचा दावा युक्रेननं केला आहे. तर या युद्धात 7,000 ते 15,000 रशियन सैनिकांचा जीव गेल्याचा अंदाज नाटोनं व्यक्त केला आहे. अफगणिस्तानात जवळपास 10 वर्ष चाललेल्या युद्धात रशियाचे जवळपास 15,000 सैनिक मारले गेले होते ही विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तर 23 मार्चपर्यंत युक्रेनच्या 3,600 पेक्षाही जास्त नागरिकांचाही मृत्यू झाल्याचा दावा युक्रेन सरकारनं केला आहे. पण ही संख्या 950 पेक्षा थोडीच जास्त असू शकते असं संयुक्त राष्ट्रांचं (UN) म्हणणं आहे. खरं तर रशिया युक्रेनमध्ये जे युद्ध करत आहे ते अत्यंत थकवणारं आणि महाग आहे. त्याचा अंत कधी होईल , कसा होईल कोणालाच माहिती नाही. आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव गेला आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेवर याचे विपरित परिणाम होत आहेत. अन्य देशांवरही या युद्धाचे परिणाम जाणवू लागले आहेत. जागतिक व्यापारावरही या युद्धामुळे परिणाम झाला आहे. इंधन आणि अन्य वस्तूंच्या किंमतीत भरपूर वाढ झाली आहे. महागाई वाढू लागली आहे. अनेक देशांमधल्या संबंधांवरही परिणाम होत आहे. युद्ध होणाऱ्या दोन राष्ट्रांमधीलच नाही तर अन्य राष्ट्रांवरही या युद्धाचे महाभयंकर परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे युद्ध संपवावं इतकीच सगळ्यांची इच्छा आहे.
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या