मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पृथ्वीवरील लाईफलाईन! या ठिकाणी मिळतोय जगातला 20 टक्के ऑक्सिजन

पृथ्वीवरील लाईफलाईन! या ठिकाणी मिळतोय जगातला 20 टक्के ऑक्सिजन

अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट एक अतिशय समृद्ध इकोसिस्टम आहे. येथे सुमारे 40 हजार प्रकारच्या वनस्पती, 1300 पक्षांच्या प्रजाती, 3000 प्रकारचे मासे, 430 प्रकारचे सस्तन प्राणी आणि 25 लाख प्रकारचे कीटक आहेत.

अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट एक अतिशय समृद्ध इकोसिस्टम आहे. येथे सुमारे 40 हजार प्रकारच्या वनस्पती, 1300 पक्षांच्या प्रजाती, 3000 प्रकारचे मासे, 430 प्रकारचे सस्तन प्राणी आणि 25 लाख प्रकारचे कीटक आहेत.

अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट एक अतिशय समृद्ध इकोसिस्टम आहे. येथे सुमारे 40 हजार प्रकारच्या वनस्पती, 1300 पक्षांच्या प्रजाती, 3000 प्रकारचे मासे, 430 प्रकारचे सस्तन प्राणी आणि 25 लाख प्रकारचे कीटक आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 13 मे : दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट (Amazon Rainforest) हे जगातील सर्वात मोठं जंगल, वनक्षेत्र आहे. अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट एका मोठ्या भूभागावर पसरलं आहे. या जंगलात 25 लाख किटकांच्या प्रजाती आहेत. त्याशिवाय हजारो प्रकारच्या वनस्पती आणि जवळपास 2 हजार प्रकारचे प्राणी-पक्षी आहेत.

Amazon हे जगातील सर्वात मोठं उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट आहे. 55 लाख दशलक्ष चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं हे जंगल इतकं मोठं आहे, की ब्रिटन आणि आयर्लंड यात 17 वेळा फिट होतील. या जंगलाच्या इतक्या मोठ्या आकारामुळे, हे संपूर्ण जगाला 20 टक्के ऑक्सिजन पुरवतं. दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन जंगल नऊ देशांच्या सीमेवर आहेत. यात ब्राझील, बोलिविया, पेरु, इक्वाडोर, कोलंबिया, व्हेनुजुएला, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गुयाना सामिल आहे. या जंगलाचा 60 टक्के भाग ब्राझीलमध्ये आहे.

या जंगलाच्या उत्तरेस अ‍ॅमेझॉन नदी (Amazon River) वाहते, जी शेकडो जलमार्गांचं जाळं असून 6,840 किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे. याबाबत अनेक वादही आहेत. अनेक संशोधकांचं असं म्हणणं आहे, की अ‍ॅमेझॉन नील नदीनंतर (Nile River) जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे.

2007 मध्ये मार्टिन स्ट्रेल नावाच्या एका व्यक्तीने अ‍ॅमेझॉन नदी पोहत, पार केली होती. आपली ही जंगल यात्रा पूर्ण करण्यासाठी मार्टिन 66 दिवस दररोज 10 तासांपर्यंत नदीत पोहत होते.

अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट येथे जवळपास 400 ते 500 स्वदेशी अमेरिकन आदिवासींच्या जाती-जमाती आहेत. यापैकी 50 जमातींचा बाहेरच्या जगाशी कधीही संपर्क झाला नसल्याचं बोललं जातं.

(वाचा - घर भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली महिला; भाडेकरुने घरातूनच कोटींनी मिळवलं उत्पन्न)

अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट एक अतिशय समृद्ध इकोसिस्टम आहे. येथे सुमारे 40 हजार प्रकारच्या वनस्पती, 1300 पक्षांच्या प्रजाती, 3000 प्रकारचे मासे, 430 प्रकारचे सस्तन प्राणी आणि 25 लाख प्रकारचे कीटक आहेत. या रेनफॉरेस्टमध्ये जगातील सर्वात सुंदर आणि धोकादायक जीवही राहतात. या नदीत इलेक्ट्रिक ईल, पिरान्हा मासा, विषारी बेडूक, जॅग्वार, विषारी साप आहेत.

अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये एक अतिशय विचित्र मासा आढळतो, ज्याला पिरारुकु असं म्हणतात. हा मासा इतर माशांना पाळण्याच्या नावाखाली खातो आणि जवळपास तीन मीटरपर्यंत लांब होतो. या माशाच्या तोंडासह, त्याच्या जीभेवरही दात असल्याचं सांगितलं जातं.

(वाचा - लाखो-करोडो सिलेंडरपेक्षाही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करतात ही 6 झाडं)

अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टमधील घनदाट झाडांमुळे जंगलाच्या पृष्ठभागावर नेहमीच अंधार असतो. झाडांमुळे इतका दाट थर निर्माण होतो, की ज्यावेळी पाऊस पडतो, त्यावेळी पाणी पृष्ठभागावर पोहचण्यास 10 मिनिटं लागतात. वनस्पती हवेतील कार्बन डाय ऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, त्यामुळे हवामानतील बदल मर्यादित करण्यात, अफाट नैसर्गिक सौंदर्य असणारं अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट महत्त्वाची भूमिका बजावते.

First published:

Tags: Amazon, Oxygen supply