कडुलिंब - कडुलिंबांचं झाडं अनेक औषधी गुणांनीयुक्त आहे. हे झाडं पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. हे एकप्रकारे नॅचरल प्यूरिफायरच आहे. वातावरणातील अशुद्धी साफ करुन हवेत ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं काम हे झाड करतं. कडुलिंबांचं झाड लावल्याने आसपासच्या हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.