जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अफगाणिस्तानात चोरीची भयंकर तालिबानी शिक्षा, 3 चोरांना गोळी मारुन लटकवलं JCB ला

अफगाणिस्तानात चोरीची भयंकर तालिबानी शिक्षा, 3 चोरांना गोळी मारुन लटकवलं JCB ला

अफगाणिस्तानात चोरीची भयंकर तालिबानी शिक्षा, 3 चोरांना गोळी मारुन लटकवलं JCB ला

तालिबानच्या भीतीखाली असलेले लोक आता पुन्हा त्यांच्या शिक्षा देण्याच्या पद्धतीत झालेला भयंकर बदल पाहत आहेत. सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोमध्ये तीन मृतदेह जेसीबीला लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

अफगाणिस्तान, 6 ऑक्टोबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने केवळ आपली हुकूमतच सुरू केली नाही, तर आपलं सरकारही स्थापन केलं. यादरम्यान अनेकांनी देश सोडला. परंतु हवाई मार्गदेखील बंद झाल्याने अनेक जण तिथेच अडकून पडले. तालिबानच्या भीतीखाली असलेले लोक आता पुन्हा त्यांच्या शिक्षा देण्याच्या पद्धतीत झालेला भयंकर बदल पाहत आहेत. नुकतंच अफगाणिस्तानमध्ये चोरांना शिक्षा दिलेल्या शिक्षेचा फोटो शेअर करण्यात आला होता. हा फोटो आता व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोमध्ये तीन मृतदेह जेसीबीला लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यांच्यावर गोळी झाडल्यानंतर, त्यांना लटकवण्यात आलं होतं. तालिबानी प्रवक्ताने सांगितलं, की या तीन चोरांनी एका व्यक्तीच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना गोळी मारण्यात आली. तालिबानींच्या राज्यात चोरी केल्यावर त्याचा परिणाम काय होतो, याबाबत लोकांना सांगण्यासाठी गुन्हेगारांचे मृतदेह अशाप्रकारे जेसीबीला लटकवले.

Explainer: तालिबानकडे युद्धासाठी एवढा पैसा येतो कुठून? कोण पुरवतंय रसद?

सोशल मीडियावर हे फोटो अफगाणिस्तानच्या एमनेस्टी इंटरनॅशनल ग्रुपने शेअर केला आहे. फोटोमध्ये तीन मृतदेह हवेत लटकत असल्याचं दिसतंय. खाली उभे असलेले शेकडो लोक हा संपूर्ण प्रकार पाहत आहेत. या सर्व प्रकारावरुन तालिबान अजूनही 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानात क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा असलेला आहे, हेच समोर येतं.

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात- निर्यातीवर घातली बंदी

मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आपला कब्जा केला आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देशात महागाई भयंकर वाढली असून महिलांची स्थितीही दयनीय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात