मराठी बातम्या /बातम्या /देश /अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात- निर्यातीवर घातली बंदी

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात- निर्यातीवर घातली बंदी

तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर आता त्यांच्याबरोबर शेजारी किंवा इतर देशांसोबतचे संबंध देखील बदलू लागले आहेत.

अफगाणिस्तान, 19 ऑगस्ट: तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर आता त्यांच्याबरोबर शेजारी किंवा इतर देशांसोबतचे संबंध देखील बदलू लागले आहेत. भारत (India) आणि अफगाणिस्तान हे जवळचे मित्र आहेत, पण तालिबान सत्तेवर येताच त्यांनी भारतासोबतचे आयात आणि निर्यात (Import-Export) दोन्ही बंद केले आहेत. तालिबाननं भारतासोबतची सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. सुकामेव्याच्या मिठायांच्या किंमतीही वाढणार असल्याचं चित्र आहे.

वृत्तसंस्था ANI ला डॉ. अजय सहाई यांनी सांगितलं की, तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आपला माल अनेकदा पाकिस्तानातून पुरवला जात होता, जो आता बंद झाला आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून आम्ही पुरवठा सुरू करू शकू. पण सध्या तालिबानने निर्यात-आयात बंद केली आहे.

Kabul Airport: ''...त्याचे हात- पायही होते गायब'', कुटुंबियांनी सांगितला अनुभव

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो

डॉ. अजय सहाई यांच्यानुसार, व्यवसायाच्या बाबतीत भारत हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार आहे. 2021 मध्येच आपल्या देशातील निर्यात 835 मिलियन डॉलर होती. तर 510 मिलियन डॉलरची आयात होती. आयात-निर्यातीव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये सुमारे 400 योजनांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.

भारत सारख, चहा, कॉफी मसाला सहित अन्य वस्तूंची निर्यात करतो. तर ड्राय फ्रूट्स, कांदे इत्यादी मोठ्या प्रमाणावर आयात केले जातात. अशा स्थितीत येत्या काळात सुक्या मेव्याचे भाव वाढू शकतात.

'या' देशात आता लोकांना घ्यावा लागणार Vaccineचा बूस्टर शॉट

दरम्यान अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येताच त्यावर निर्बंध सुरू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले आहे की, अफगाणिस्तान यापुढे आयएमएफ संसाधनांचा वापर करू शकणार नाही. त्याला कोणतीही नवीन मदत मिळणार नाही.

First published:

Tags: Afghanistan, India, Taliban