मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'पुरुष बरोबर नसेल तर बाजारात जायचं नाही, सँडल घालायचे नाहीत'; तालिबानी राजवटीत आता महिलांवर नवी बंधनं

'पुरुष बरोबर नसेल तर बाजारात जायचं नाही, सँडल घालायचे नाहीत'; तालिबानी राजवटीत आता महिलांवर नवी बंधनं

शिकून मोठ्या होऊ, करिअर करू वगैरे स्पप्न पाहणाऱ्या अफगाणी महिलांच्या स्वप्नांचा तालिबानी राजवटीत आता चक्काचूर होणार आहे.

शिकून मोठ्या होऊ, करिअर करू वगैरे स्पप्न पाहणाऱ्या अफगाणी महिलांच्या स्वप्नांचा तालिबानी राजवटीत आता चक्काचूर होणार आहे.

शिकून मोठ्या होऊ, करिअर करू वगैरे स्पप्न पाहणाऱ्या अफगाणी महिलांच्या स्वप्नांचा तालिबानी राजवटीत आता चक्काचूर होणार आहे.

    काबूल, 14 ऑगस्ट : तालिबान (Taliban) आणि अफगाणिस्तान (Afghanistan Crisis) यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. याचा सर्वांत जास्त परिणाम सामान्य नागरिकांवर होतो आहे. जहरा नावाच्या एका अफगाणी महिलेने सांगितलं, की ती तालिबान नसलेल्या अफगाणिस्तानात वाढली, ज्यात मुलींना (Women in Afghanistan) शिकण्याचं स्वातंत्र्य होतं. तसंच महिला करिअर करण्याचं स्वप्नही पाहू शकत होत्या. गेल्या पाच वर्षांत त्या जहराने महिलांसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी आणि लैंगिक समानतेबद्दल जागृती करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांसह (NGO) काम केलं; मात्र तिच्या स्वप्नांचा गुरुवारी सायंकाळी (12 ऑगस्ट) चक्काचूर झाला. कारण तालिबानने हेरात (Herat) शहरात प्रवेश केला आणि तो प्रांत आपल्या ताब्यात आल्याचं जाहीर करून त्यांनी आपले पांढरे झेंडे फडकवले.

    अफगाणिस्तानचे राष्ट्रपती राजीनामा देणार, कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत

    आई-वडील आणि पाच भावंडांसह राहणारी जहरा सांगते, 'आम्ही हे सारं पाहून इतकं घाबरलो आहोत, की आता घराबाहेर पडायचीही भीती वाटते. तालिबानच्या वाढत्या प्रभावावरून आता असं वाटू लागलं आहे, की आम्ही एवढं शिक्षण कशाला घेतलं आणि भविष्याची एवढी स्वप्नं कशाला पाहिली, जिथे आम्हाला स्वतःला लपवण्यासाठी घरातच राहावं लागतंय.'

    लष्करभरतीसाठी या देशात महिलांना द्यावी लागायची कौमार्य चाचणी, कशी थांबवली प्रथा?

    शरणार्थींच्या बाबतीत संयुक्त राष्ट्रांचे उच्चायुक्त (UNHCR) सांगतात, की मे महिन्याच्या अखेरीपासून आतापर्यंत सुमारे अडीच लाख अफगाणी नागरिक आपल्या घरातून पळून गेले आहेत. इस्लामचे कडक आणि अन्याय्य नियम तालिबान पुन्हा लागू करील, ही भीती हेच त्यांच्या पळून जाण्यामागचं एकमेव कारण आहे. पळून गेलेल्यांमध्ये 80 टक्के महिला आणि बालकांचा समावेश आहे.

    संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुटेरस (Antonio Guterres) यांनी गुरुवारी (12 ऑगस्ट) तालिबानला आवाहन केलं, की त्यांनी अफगाणिस्तानवरचं आक्रमण तातडीने थांबवावं. तसंच, दीर्घ काळ सुरू राहू शकेल असं युद्ध थांबवण्यासाठी विश्वासाने चर्चा करावी. न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी बातचीत करताना अँतोनियो गुटेरस यांनी तालिबानकडून महिला आणि पत्रकारांना लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या मानवाधिकांरांचं (Human Rights) उल्लंघन करणाऱ्या कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations) परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच, हे युद्ध शहरी भागांमध्ये पोहोचणं अधिक चिंताजनक असल्याचं त्यांनी सांगितलं.

    'लढा वाईट मानसिकतेविरोधात'; तालिबानविरुद्ध लढण्यासाठी या महिलेने उभी केली फौज

    एका वृत्तानुसार, तालिबान्यांनी काबूलच्या उत्तरेकडच्या तखर प्रांतात ट्रॅक्टरवरून जाणाऱ्या काही लोकांना थांबवलं आणि त्यावर बसलेल्या मुलींना सँडल घातल्याबद्दल दम भरण्यात आला. राज्यातल्या एका शिक्षिकेने सांगितलं, की आता पुरुष सोबत असल्याशिवाय कोणालाही बाजार किंवा कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नाही.

    जहराने सांगितलं, की साधारण एका महिन्यापूर्वी तिने तालिबान्यांमुळे हेरातमध्ये असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये जाणं थांबवलं. ती घरूनच काम करत होती; पण आता तालिबान्यांनी शहरात इतका हिंसाचार केला आहे, की ती घरातूनही काम करू शकत नाहीये. हे सांगतानाही तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आता आपण कधीच पुन्हा कामावर जाऊ शकत नाही, असं वाटत असल्याचं तिने सांगितलं. तिची 12 वर्षांची बहीण कधीच शिकू शकणार नाही, तिचा भाऊ कधीच फुटबॉल खेळू शकणार नाही आणि तिला स्वतःलाही आपल्या आवडीचं गिटारवादन करता येणार नाही, अशी भीती तिच्या मनात घर करून राहिली आहे.

    First published:

    Tags: Afghanistan, Taliban, Women