मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Breaking : अफगाणिस्तानचे राष्ट्रपती राजीनामा देणार, कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत

Breaking : अफगाणिस्तानचे राष्ट्रपती राजीनामा देणार, कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत

अफगाणिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी  (Ashraf Ghan) राजीनामा देण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी (Ashraf Ghan) राजीनामा देण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी (Ashraf Ghan) राजीनामा देण्याची शक्यता आहे.

मुंबई, 14 ऑगस्ट : अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी  (Ashraf Ghan) राजीनामा देण्याची शक्यता आहे. News 18 ला सुत्रांनी ही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानमधील विविध प्रांतामध्ये सुरु असलेल्या चकमकी थांबवणे आणि तालिबानशी तात्काळ युद्धविराम करण्याच्या उद्देशानं घनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घनी राजधानी काबूलचं संरक्षण व्हावं यासाठी बुधवारी मजार-ए-शरीफमध्ये गेले होते. त्यावेळी सरकारशी संबंधित मिलिशिया कमांडरांसोबत त्यांची बैठक झाली.

तालिबान दहशतवादी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या अगदी जवळ आले आहेत. त्याचवेळी शांतता चर्चा समिती नवा मसूदा तयार करत आहे. यामध्ये राष्ट्रपती अश्रफ घनी सरकारला पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे.

सीएनएन-न्यूज 18 (CNN News18) ला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम करण्यासाठी नवा तोडगा काढण्यावर चर्चा सुरू आहे. यानुसार तालिबान, लष्करी अधिकारी आणि विद्यमान सरकारमधील काही प्रतिनिधी यांचे एकत्र हंगामी सरकार बनेल. याबाबत सर्व प्रकारची चर्चा आणि विचार विनिमय झाल्यानंतर या सत्तावाटपाचा फॉर्म्युला संबंधित पक्षांना दिला जाईल. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे अजून ही योजना अफगाणिस्तान सरकार किंवा तालिबान यापैकी कुणाशीही शेअर करण्यात आलेली नाही.'

अमेरिकन सैन्य काबूलमध्ये दाखल

अफगाणिस्तानवरील तालिबानचे वाढते वर्चस्व लक्षात घेऊन अमेरिकी दूतावास रिकामा करण्यास मदत करण्यासाठी अमेरिकन मरीन बटालीयनची 3000 सैन्यांची तुकडी शुक्रवारी अफगाणिस्तानात दाखल झाली आहे. उर्वरित सैन्य रविवारी दाखल होणार आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेचे अतिरिक्त सैन्य दाखल होत असल्यानं अमेरिका यापूर्वी जाहीर केलेली 31 ऑगस्टच्या डेडलाईन पाळणार की नाही ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

'आठवडाभरात काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तानवर करणार कब्जा'; तालिबानींचा दावा

तालिबाननं शनिवारी पहाटे काबूलच्या दक्षिणेला असलेल्या लागूर प्रांतावर कब्जा केला. तसंच देशाच्या उत्तरेला असलेल्या मजार-ए-शरीफ शहरावर चारही बाजूंनी हल्ले सुरू केले आहेत. लोगार प्रांताचे खासदार होमा अहमदी यांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबाननी त्यांचे संपूर्ण राज्य ताब्यात घेतले आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban