मराठी बातम्या /बातम्या /विदेश /दोन महिन्यांच्या सोहेलला सोपवलं होतं अमेरिकन सैनिकाच्या हाती, अजूनही आहे बेपत्ता

दोन महिन्यांच्या सोहेलला सोपवलं होतं अमेरिकन सैनिकाच्या हाती, अजूनही आहे बेपत्ता

यापैकी एक म्हणजे मिर्झा अली अहमदी. ते आणि त्यांची पत्नी सुराया पाच मुलांसह काबूल विमानतळावर पोहोचले.

यापैकी एक म्हणजे मिर्झा अली अहमदी. ते आणि त्यांची पत्नी सुराया पाच मुलांसह काबूल विमानतळावर पोहोचले.

यापैकी एक म्हणजे मिर्झा अली अहमदी. ते आणि त्यांची पत्नी सुराया पाच मुलांसह काबूल विमानतळावर पोहोचले.

न्यूयॉर्क, 06 नोव्हेंबर: जेव्हा तालिबाननं (Taliban)अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला तेव्हा तेथील मोठ्या संख्येनं लोकं देश सोडून जात होती. तेव्हा हे लोक काबूल विमानतळावर (Kabul Airport) एकत्रित जमले होते. कोणता तरी देश आपल्याला एअरलिफ्ट करून नवजीवन देईल, अशी आशा अफगाणिस्तानच्या लोकांनी व्यक्त केली होती. यापैकी एक म्हणजे मिर्झा अली अहमदी. ते आणि त्यांची पत्नी सुराया पाच मुलांसह काबूल विमानतळावर पोहोचले. तेथे त्यांनी आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला अमेरिकन सैनिकांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र आता मुलाचा काही पत्ता कळत नाही आहे.

मिर्झा अली अहमदी म्हणाले की, 19 ऑगस्ट रोजी मी, पत्नी आणि 5 मुलांसह काबूल विमानतळाबाहेर होतो. तिथे खूप गर्दी होती. आपला दोन महिन्यांचा मुलगा सोहेलला कोणतीही दुखापत होऊ नये, असे त्यांना वाटत होते. यादरम्यान विमानतळाच्या आत 5 मीटर उंच भिंतीवर तैनात असलेल्या एका अमेरिकन सैनिकानं त्याला मदत हवी आहे का, असे विचारलं. त्यानंतर मिर्झाने सोहेलला त्या सैनिकांच्या स्वाधीन केलं. काही वेळानं मी आत जाऊन सोहेलला परत घेऊन येईन, अशी त्याला आशा होती.

हेही वाचा- Raj Thackeray आजपासून राहणार नव्या घरात, हे असेल नव्या घराचं नाव

पण आत गेल्यावर सोहेल कुठेच दिसत नव्हता. मिर्झा अली यांनी 10 वर्षे अमेरिकन दूतावासात सुरक्षा रक्षक म्हणून काम केलं होतं. मिर्झा यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांच्या मुलाबद्दल विचारायला सुरुवात केली. मिर्झा यांनी सांगितलं की, एका लष्करी कमांडरनं मला सांगितलं की विमानतळ मुलासाठी खूप धोकादायक आहे आणि लहान मुलांसाठी एका खास भागात हलवण्यात आले आहे. मात्र तेथे पोहोचल्यावर ते रिकामेच होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिर्झा अली म्हणाले, 'अमेरिकन कमांडर माझ्यासोबत शोध घेण्यासाठी विमानतळाच्या आसपास गेले होते. त्याला इंग्रजी येत नसल्याने कमांडरचे नाव समजू शकले नाही आणि संवाद साधण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घेतल्याचे त्याने सांगितले. यात ३ दिवस गेले.

हेही वाचा- Mukesh Ambani लंडनच्या आलिशान महलात स्थायिक होणार? रिलायन्सनं दिलं स्पष्टीकरण

मिर्झा अली, पत्नी सुराया आणि त्यांच्या 4 मुलांसह पहिल्यांदा इव्हॅक्युएशन कतारला फ्लाइटनं गेले आणि नंतर जर्मनीला गेले. अखेरीस ते यूएसला पोहोचले. हे कुटुंब आता फोर्ट ब्लिस, टेक्सास येथे इतर अफगाण निर्वासितांसोबत अमेरिकेत कुठेतरी स्थायिक होण्याची वाट पाहत आहे. त्याचे येथे कोणीही नातेवाईक नाहीत.

मिर्झा अलीने सांगितले की, तो प्रत्येक व्यक्तीला भेटतो, तो त्यांना सोहेलबद्दल विचारणा करतो. मिर्झा म्हणाले, 'प्रत्येकजण वचन देतो की ते आपापल्या परीने मदत करतील. पण ती फक्त आश्वासने आहेत.

अमेरिकन सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण यूएस तळ आणि परदेशातील स्थानांसह संबंधित सर्व एजन्सीकडे पाठवण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, काबूल विमानतळावर झालेल्या गोंधळादरम्यान मुलाला शेवटचे अमेरिकन सैनिकाकडे सोपवताना पाहिलं होतं. मात्र दुर्दैवाने कोणीही मुलाला शोधू शकले नाही.

First published:

Tags: Afghanistan, America, Kabul