मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Raj Thackeray यांचा नव्या घरात गृहप्रवेश, अमित ठाकरेंच्या हस्ते नव्या घराच्या नामफलकाचं पूजन

Raj Thackeray यांचा नव्या घरात गृहप्रवेश, अमित ठाकरेंच्या हस्ते नव्या घराच्या नामफलकाचं पूजन

Raj Thackeray New House: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या नव्या घरात (New House)  प्रवेश केला आहे.

Raj Thackeray New House: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या नव्या घरात (New House) प्रवेश केला आहे.

Raj Thackeray New House: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या नव्या घरात (New House) प्रवेश केला आहे.

मुंबई, 06 नोव्हेंबर: आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Maharashtra Navnirman Sena)राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या नव्या घरात (New House) प्रवेश केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या हस्ते नव्या घराच्या नामफलकाचं पूजन करण्यात आलं. शिवतीर्थ असं या नव्या घराचं नाव असणार आहे. राज ठाकरे यांच्या नव्या शिवतीर्थ वास्तुच्या वरती भगवा झेंडा फडकावत ठाकरे कुटूंबीयांनी गृहप्रवेश केला आहे.

दादर येथील 'कृष्णकुंज'शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी आज कुटुंबासह गृहप्रवेश करतील.

कृष्णकुंज शेजारीचं नवं घर

राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे समीकरणच वेगळं आहे. दादरमध्ये कृष्णकुंज म्हणजे राज ठाकरे यांचं घर डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र आता राज ठाकरेंची निवासस्थानाची ओळख आता बदलली आहे. कृष्णकुंज शेजारीच 5 मजली इमारत हेच राज ठाकरेंचं नवं घर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे कृष्णकुंज येथे वास्तव्यास आहेत. राज ठाकरे यांना भेटायचं झाल्यास सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते कृष्णकुंजवर भेटायला येतात.

हेही वाचा- पालघरमध्ये Hit and Run, पोलीस अधिकाऱ्यानंच उडवलं पादचाऱ्यांना

कसं असेल राज ठाकरेंचं नवं घर

कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरेंचं 5 मजली घर असेल. घराच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे. तसंच याच इमारतीत कार्यालयही असतील. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी आयोजित करण्यात येतील. अन्य मजल्यांवर ठाकरे कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली आहे. राज ठाकरेंच्या या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे. या नव्या घराच्या इमारतीचं काम आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे आज राज ठाकरे कुटुंबीय या घरात प्रवेश करणार आहेत. त्यासाठीची जय्यत तयारी देखील झाली आहे.

First published:

Tags: MNS, Raj Thackeray (Politician)