मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mukesh Ambani यांचा आलिशान महल, कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक होण्याचं वृत्तावर रिलायन्सचं स्पष्टीकरण

Mukesh Ambani यांचा आलिशान महल, कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक होण्याचं वृत्तावर रिलायन्सचं स्पष्टीकरण

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी लंडनच्या स्टोक पार्कमध्ये (London's Stoke Park) 592 कोटी रुपये खर्च करुन 300 एकर जमीन खरेदी केली आहे.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी लंडनच्या स्टोक पार्कमध्ये (London's Stoke Park) 592 कोटी रुपये खर्च करुन 300 एकर जमीन खरेदी केली आहे.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी लंडनच्या स्टोक पार्कमध्ये (London's Stoke Park) 592 कोटी रुपये खर्च करुन 300 एकर जमीन खरेदी केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 06 नोव्हेंबर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन (chairman of Reliance Industries and Asia's richest businessman) आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी लंडनच्या स्टोक पार्कमध्ये (London's Stoke Park) 592 कोटी रुपये खर्च करुन 300 एकर जमीन खरेदी केली आहे. त्यानंतर मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह लंडनला (London) स्थायिक होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यावर आता रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) स्पष्टीकरण दिलं आहे.

मुकेश अंबानी यांनी लंडनमध्ये जमीन विकत घेतली आहे. या रिसॉर्टमध्ये 49 बेडरूम आहेत. मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मुकेश अंबानी यांनी बर्किंगहॅमशायरमधील स्टोक पार्कजवळ हे जमीन खरेदी केलं आहे. शुक्रवारी, अंबानी येथे स्थायिक होऊ शकतात अशी बातमी समोर आली. मात्र संध्याकाळी उशिरा रिलायन्स इंडस्ट्रीजने या वृत्ताचं खंडन केलं.

मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक होण्याबाबतचे वृत्त निराधार असल्याचे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचं स्पष्टीकरण

हे वृत्त समोर आल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी सायंकाळी उशिरा एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले. रिलायन्स इंडस्ट्रीजनं निवेदनात म्हटलं की, एका वृत्तपत्रात निराधार वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अंबानी कुटुंब लंडनच्या स्टोक पार्कमध्ये स्थायिक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, अनिल अंबानी किंवा त्यांच्या कुटुंबाची अशी कोणतीही योजना नाही. ते लंडन किंवा जगाच्या इतर कोणत्याही भागात स्थायिक होण्याचा विचार करत नाहीत.

हेही वाचा-  पालघरमध्ये Hit and Run, पोलीस अधिकाऱ्यानंच उडवलं पादचाऱ्यांना

रिलायन्स ग्रुपची कंपनी RIIHL ने स्टोक पार्कमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. या हेरिटेज प्रॉपर्टीचा वापर गोल्फ आणि इतर खेळांसाठी केला जाईल. त्यासाठी स्थानिक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. वेगाने वाढणारा ग्राहक व्यवसाय पाहता ही मालमत्ता संपादित करण्यात आली आहे. भारत ज्या संस्कृतीचे आयोजन करतो त्याला जागतिक दर्जाची ओळख द्यायची आहे.

कोरोनामध्ये दुसऱ्या घराची गरज भासू लागली

'मिड-डे'ने आपल्या वृत्तात लिहिले आहे की, कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात या कुटुंबाला दुसऱ्या घराची गरज भासू लागली. मात्र, मुकेश अंबानी यांचे मुंबईतील अल्टामाऊंट रोडवर 4 लाख स्क्वेअर फुटांवर अँटिलिया नावाचे आलिशान घर आहे. लॉकडाऊन दरम्यान मुकेश अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाने गुजरातमधील जामनगरमध्येही वेळ घालवला आहे. त्यांची तिथेही रिफायनरी आहे, जी जगातील सर्वात मोठी आहे.

लंडनच्या घरात अंबानींच्या दिवाळी

सूत्रांनी सांगितलं की, भारतातील लोक सहसा त्यांच्या घरी दिवाळी साजरी करतात, मात्र मुकेश अंबानी यांच्या कुटुंबानं यावर्षीची दिवाळी त्यांच्या लंडनमधील नवीन घरात साजरी केली. मुकेश अंबानी यांचे कुटुंब अडीच महिने सतत मुंबईबाहेर आहे. त्यामुळेच हा अंदाज बांधला जात होता.

अंबानींचा लंडनमधला महल कसा आहे?

मुकेश अंबानी यांनी लंडनमधील बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क (Buckinghamshire, Stoke Park) या ठिकाणी 300 एकरची जागा विकत घेतली. या परिसरात एक ऐतिहासिक वास्तू असेल. मुकेश अंबानींनी 592 कोटी रुपये देऊन याची जमीन खरेदी केली. यात तब्बल 49 बेडरूम्स असतील. यात एक मिनी हॉस्पिटल असेल. तसंच यात सर्व सुसज्ज सोयी उपलब्ध असतील. ही वास्तू खुल्या वातावरणात आहे.

हेही वाचा- Terrible Accident! पहाटे पहाटे एक्स्प्रेस वेवर 30 गाड्यांचा भीषण अपघात

ही वास्तू खूप जुनी आहे. 1908 सालापर्यंत ती खासगी मालमत्ता होती. त्यानंतर या वास्तूचे एका क्लबमध्ये रुपांतर करण्यात आलं. यामध्ये अलिशान हॉटेल असून या वास्तूच्या आवारात एक गोल्फ क्लब सुद्धा आहे.

जगातील 11 वा सर्वात श्रीमंत उद्योगपती

ब्लूमबर्ग बिलियनेअरच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी सध्या जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये 11 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 7 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. दरम्यान अनिल अंबानी अद्याप 100 अब्ज डॉलरच्या यादीतून बाहेर आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 98 अरब डॉलर आहे. तेल, केमिकल, दूरसंचार आणि रिटेल हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत.

First published:

Tags: Mukesh ambani