Home /News /videsh /

अफगाणिस्तानच्या महिला पत्रकाराचा जीव धोक्यात; मदतीसाठी भारताकडे धाव, म्हणाली...

अफगाणिस्तानच्या महिला पत्रकाराचा जीव धोक्यात; मदतीसाठी भारताकडे धाव, म्हणाली...

अफगाणिस्तानातील सरकारी टीव्ही वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या महिला अँकर खदीजा अमीन यांनी आपल्या सुरक्षितेबाबत भीती व्यक्त केली आहे. (फाइल फोटो- Shutterstock)

अफगाणिस्तानातील सरकारी टीव्ही वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या महिला अँकर खदीजा अमीन यांनी आपल्या सुरक्षितेबाबत भीती व्यक्त केली आहे. (फाइल फोटो- Shutterstock)

अफगाणिस्तानातील सरकारी टीव्ही वृत्तवाहिनी 'रेडिओ टीव्ही अफगाणिस्तान' (RTA) साठी काम करणाऱ्या महिला अँकर (News Anchor) खदीजा अमीन (Khadija Amin) यांनी आपल्या सुरक्षितेबाबत भीती व्यक्त केली आहे.

    काबूल, 22 ऑगस्ट: तालिबान संघटनेनं अफगाणिस्तानवर ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे. येथील महिलांच्या भविष्याबद्दल आणि अधिकारांबाबत संपूर्ण जग चिंताग्रस्त झालं आहे. अफगाणिस्तानात काम करणाऱ्या महिलांचं भविष्य तर पूर्णपणे अंधारमय झालं आहे. अशातच अफगाणिस्तानातील सरकारी टीव्ही वृत्तवाहिनी 'रेडिओ टीव्ही अफगाणिस्तान' (RTA) साठी काम करणाऱ्या महिला अँकर (News Anchor) खदीजा अमीन (Khadija Amin) यांनी आपल्या सुरक्षितेबाबत भीती व्यक्त केली आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबाननं काबूलवर ताबा मिळवल्यानंतर, खदीजा यांना अँकरींग करण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्यांना आठवडाभर प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आलं आहे. पण एक आठवडा उलटून गेल्यानंतर व्यवस्थापनाकडून कोणतीही शाश्वती देण्यात आली नाही. यानंतर आता खदीजा यांनी भारतात येण्यासाठी व्हिसा दाखल केला आहे. भारतानं आपल्याला मदत करावी, अशी याचना तिने न्यूज18 इंडियाकडे केली आहे. हेही वाचा-कोण आहे हा चिमुरडा? ज्याला विना पासपोर्ट मिळाली भारतात एन्ट्री खदीजा अमीन यांनी न्यूज18 ला पुढे सांगितलं की, 'तालिबानी लोकांनी आरटीए वृत्तवाहिनीवर ताबा मिळवला आहे. सर्व कामकाज तालिबान्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून वृत्तवाहिनीतील कोणतीही महिला अँकर कामावर गेली नाही. मीही कामावर जाऊ शकले नाही. आता पूर्वीसारखं अँकरिंग करता येत नाही. आम्हाला काही काळ प्रतीक्षा करायला सांगितली आहे. सध्या आम्ही आमच्या घरात आहोत. आमच्या टीममध्ये एकूण 5 महिला अँकरिंग करत होत्या, त्या सर्वजण आता घरीच आहेत. हेही वाचा-तालिबानींनी घर जाळलं; जीव वाचवण्यासाठी विमानतळावर राहतायेत 5 भावंडं खदीजा अमीन यांनी सुरक्षा आणि भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, 'काम करण्यासाठी अगोदर जे स्वातंत्र्य होतं ते आता मिळणार नाही. आम्ही काम करणं त्यांच्यासाठी एक समस्या आहे. पण आशा आहे की, आम्हाला काम करण्याची परवानगी मिळेल. 5-6 दिवस उलटून गेले तरीही आमच्या भवितव्याबद्दल कोणतंही आश्वासन देण्यात आलं नाही. मी अनेक आंतरराष्ट्रीय वृत्त वाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे आता मी कामावर गेले, तर माझ्या जीवाला धोका आहे. माझ्यासोबत काय होईल, हेही मला माहीत नाही. हेही वाचा-तालिबानला केवळ महिलांचाच नाही तर शिक्षणाचाही आहे तिटकारा? जाणून घ्या सत्य त्यामुळे खदीजा अमीन यांना अफगाणिस्तान सोडून दुसऱ्या देशात स्थायिक व्हायचं आहे. खदीजा म्हणाल्या की, 'मी भारतात येण्यासाठी व्हिसा अर्ज केला आहे. मला दुसऱ्या देशात जायचं आहे. त्यासाठी भारत सरकारनं मला मदत करायला हवी. मला भारताचा व्हिसा मिळाला तर माझ्या अनेक समस्या सुटू शकतात.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या