Home /News /videsh /

तालिबानींनी घर जाळलं; जीव वाचवण्यासाठी विमानतळावर राहतायेत 5 भावंडं, सांगितली अफगाणिस्तानातील भयंकर स्थिती

तालिबानींनी घर जाळलं; जीव वाचवण्यासाठी विमानतळावर राहतायेत 5 भावंडं, सांगितली अफगाणिस्तानातील भयंकर स्थिती

या पाच जणींनी सांगितलं, की तालिबानींनी त्यांचं घर जाळून टाकलं. अफगाणिस्तानातून बाहेर (Afghanistan Taliban Crisis) निघण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला मात्र त्या अपयशी ठरल्या.

    नवी दिल्ली 21 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा (Taliban Regains Control of Afghanistan) केल्यानंतर देशातील स्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. अनेकजण अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत (Afghanistan Taliban Crisis) आहेत. काबूल विमानतळावरही (Kabul Airport) गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. देश सोडण्यासाठी इथले लोक मिळेल त्या मार्गानं आणि मिळेल तिथे जाण्यास तयार आहेत. विमानतळावरही हजारो महिला विमानाची प्रतिक्षा करत बसलेल्या आहेत. याच गर्दीच अडकलेल्या काबूल विमानतळावरील 5 बहिणींनी त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला आहे. या पाच जणींनी सांगितलं, की तालिबानींनी त्यांचं घर जाळून टाकलं. अफगाणिस्तानातून बाहेर निघण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला मात्र त्या अपयशी ठरल्या. एका माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, या बहिणी हजारा समुदायाच्या आहेत . त्या हिंदू कुश डोंगरातील मध्य अफगाणिस्तानात हजराजतमध्ये राहणाऱ्या शिया समूहातील आहेत. तालिबानी गेल्या बऱ्याच काळापासून या समुदायातील महिलांचं शोषण करत आहेत. या पाच बहिणींमधीय 19 वर्षाच्या आईना शेख हिनं सांगितलं, की गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या चार बहिणी आणि भावासोबत विमानतळावर बसून आहे. आम्हाला अमेरिकेत जायचं आहे. कारण, इथे आम्ही सुरक्षित नाही. नातीला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत भिडले आजी-आजोबा आणि...; अंगावर काटा आणणारी घटना अमेरिकेत जाण्यासाठी यातील चौघां भावंडांकडे पासपोर्ट नाही तसंच व्हिसा कागदपत्रही अपूर्ण असल्यानं प्रवासाची परवानगीही मिळत नाहीये. मात्र, कोणीतरी आपली मदत करेल, याच आशेवर ते आहेत. आईना हिनं क्षणार्धात सगळं कसं बदललं हे सांगताना म्हटलं, की मागील आठवड्यापर्यंत घरात हसतं-खेळतं वातावरण होतं. मात्र, त्यानंतर तालिबानींनी आमचं घर जाळलं. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आमच्या आई-वडिलांनी आम्हाला तिथन निघून जायला सांगितलं. कारण तालिबानींनी महिला आणि मुलींना पत्नी किंवा सेक्स स्लेव बनवण्याच्या बातम्या गेल्या काही काळापासून समोर येत आहेत. तालिबानींपासून वाचण्यासाठी आम्ही 5 भावंडे २४० किलोमीटर प्रवास करून विमानतळावर आल्याचंही तिनं सांगितलं. मेहबुबा मुफ्तींची जीभ घसरली, तालिबानचं उदाहरण देत मोदी सरकारला इशारा आईनाची 23 वर्षीय बहीण हाफिजाह काबूलमधील पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्यूटर विज्ञानाचं शिक्षण घेते. तर तिच्या इतर बहिणी हवा, लतीफा आणि 18 वर्षाची मरजानही सध्या तिच्यासोबत विमानतळावरच आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या