Home /News /national /

कोण आहे हा चिमुरडा? ज्याला विना पासपोर्ट मिळाली भारतात एन्ट्री

कोण आहे हा चिमुरडा? ज्याला विना पासपोर्ट मिळाली भारतात एन्ट्री

रविवारी सकाळी हे विमान दिल्लीत (Delhi) पोहोचलं. त्यातच भारतानं एका चिमुरड्याला विना पासपोर्टचं एन्ट्री दिली आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: तालिबाननं (Taliban)अफगाणिस्ताना (Afghanistan)वर कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या 87 भारतीयांना( Indians) घेऊन विमान मायदेशी परतलं आहे. रविवारी सकाळी हे विमान दिल्लीत (Delhi) पोहोचलं. त्यातच भारतानं एका चिमुरड्याला विना पासपोर्टचं एन्ट्री दिली आहे. भारतानं एका अफगाणी चिमुरडा इखनूर सिंहला सुरक्षित काबूलहून भारतात आणलं. या चिमुरड्याचा पासपोर्ट नव्हता. मात्र भारतानं विना पासपोर्ट त्याला देशात एन्ट्री दिली आहे. कृपाल सिंह सोनी असं या चिमुरड्याचं नाव आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, हिंडन विमानतळावर 168 प्रवासी दाखल झालेत. ज्यामध्ये अफगाणिस्तान शीख समुदायाचे 24 लोकांचा समावेश आहे. Video: काबूलहून 87 भारतीय मायदेशी, आणखी 300 जण On The Way आज सकाळी दिल्लीत पोहोचलं एक विमान अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या 87 भारतीयांना( Indians) घेऊन विमान मायदेशी परतलं आहे. रविवारी सकाळी हे विमान दिल्लीत (Delhi) पोहोचलं. यातलं एक विमान कतारच्या दोहा, तर दुसरं ताजिकिस्तानची राजधानी दुसांबेहून येथे पोहोचलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. यासह, त्यांनी हे देखील सांगितले की, नेपाळचे दोन नागरिक देखील विमानात उपस्थित आहेत. मंत्रालयाने सांगितले की, इतर भारतीयांनाही मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज रात्रीपर्यंत इतर 300 भारतीयांना सुखरूप त्यांच्या मायदेशी (Indians in Afghanistan) परत आणले जाईल. एकच नंबर! लसीकरणात राज्याचा नवा विक्रम, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan Crisis) भारतीय समुदायाची उपस्थिती खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रियाही वेगवान केली आहे. भारत सातत्यानं हवाई दलाच्या विमानांनी भारतीय नागरिकांना परत आणत आहे. दरम्यान, भारत सरकारने (Indian Government) आता अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित वापसी (Evacuate) साठी दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी दिली आहे. अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Afghanistan, India, Kabul

    पुढील बातम्या