जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अफगाण सैन्यातील 'त्या' अधिकाऱ्यांना तालिबानकडून धोका; भारताकडे मागितली मदत

अफगाण सैन्यातील 'त्या' अधिकाऱ्यांना तालिबानकडून धोका; भारताकडे मागितली मदत

अफगाण सैन्यातील 'त्या' अधिकाऱ्यांना तालिबानकडून धोका; भारताकडे मागितली मदत

एका अधिकाऱ्यानं म्हटलं, की आम्हाला कोणत्याही दुसऱ्या देशाशिवाय भारतावर अधिक विश्वास आहे. भारतानं आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी मदत करावी

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 सप्टेंबर : अफगाणिस्तानावर कब्जा करताच तालिबानींनी (Taliban Rule) मागील दोन दशकात बनलेली पूर्ण व्यवस्था बिघडून टाकली. लोकशाही मार्गानं निवडणूक आलेलं अफगाण सरकार (Afghan Government) आता संपुष्टात आलं आहे. त्यामुळे त्यासंबंधी प्रत्येक विभागातील लोक आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. यातीलच एक गट भारतात ट्रेनिंग घेणाऱ्या अफगाण सैन्याच्या अधिकाऱ्यांचाही (Afghan Army Officials) आहे. देशातील नवीन सरकारच्या काळात या अधिकाऱ्यांना तालिबान आणि पाकिस्तान या दोन्हींकडून धोका आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, या अधिकाऱ्यांनी भारताकडे मदतीची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की भारताकडून त्यांना मोठा आशा आहे. एका अधिकाऱ्यानं म्हटलं, की जेव्हा तालिबाननं हल्ला केला तेव्हा त्यांच्याकडे बायोमेट्रिक पॅड होते. ते लोकांना त्यावर हात ठेवण्यासाठी सांगत आणि संपूर्ण माहिती समोर येत असे. हा अतिशय भीतीदायक अनुभव होता. कतारमध्ये भारताची तालिबानसोबत औपचारिक चर्चा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे इंडियन मिलिट्री अकॅडमीमध्ये ट्रेन्ड झालेल्या या 26 वर्षीय अधिकाऱ्यानं नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, की आमच्या चार साथीदारांना मारलं असल्याचं समोर आलं आहे. आमच्याबद्दलही संपूर्ण माहिती सरकार आणि सैन्याकडे आहे. याच कारणामुळे आम्हाला सुरक्षित ठिकाणी यावं लागलं. जवळपास एका आठवड्यापासून आम्ही इथे लपलो आहोत. या अधिकाऱ्यासोबतच इतरही अनेक लोक आहेत जे पाकिस्तान आणि तालिबानच्या निशाण्यावर आहेत. एका दुसऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं, की जेव्हा त्यांना तालिबानी आल्याची बातमी मिळाली तेव्बा ते विमानतळाकडे धावले. मात्र, तिथून मारहाण करून त्यांना पळवून लावलं. यानंतरपासून ते आपल्या घरातच आहेत. हा अधिकारीही आयएमएमधून पासआऊट आहे. फक्त भारताच्या हिताचा विचार करून पावलं उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला आणखी एका अधिकाऱ्यानं म्हटलं, की मी तालिबानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम करायचो. मला माहिती आहे, की हे लोक मला जिवंत सोडणार नाही. भारतात ट्रेनिंग घेतलेल्या अधिकाऱ्यांसमोर मोठी समस्या आहे, की पाकिस्तानी आर्मीही त्यांना जिवंत सोडणार नाही. एका अधिकाऱ्यानं म्हटलं, की अनेक सैनिकांनी अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये ट्रेनिंग घेतली होती, या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी त्या देशांनी मदत केली. आम्हाला कोणत्याही दुसऱ्या देशाशिवाय भारतावर अधिक विश्वास आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात