• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • अफगाण प्रश्नी भारताच्या हिताचा विचार करून पावलं उचला, पंतप्रधान मोदींचा परराष्ट्र मंत्रालयाला सल्ला

अफगाण प्रश्नी भारताच्या हिताचा विचार करून पावलं उचला, पंतप्रधान मोदींचा परराष्ट्र मंत्रालयाला सल्ला

अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी (NSA) केवळ आणि केवळ भारतीयांच्या हिताचा (India's priority) विचार करून पावलं उचलावीत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता येऊन आता दोन आठवडे (2 week) उलटून गेले आहेत. अमेरिकेनं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर मंगळवारी अखेरचा अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kabul International Airport) पूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे. अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी (NSA) केवळ आणि केवळ भारतीयांच्या हिताचा (India's priority) विचार करून पावलं उचलावीत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिला आहे. काय म्हणाले पंतप्रधान? अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेले भारतीय नागरिक, त्यांची सुरक्षा आणि भारताची अफगाणिस्तानमधील बदलल्या परिस्थितीबाबतची भूमिका या सगळ्या मुद्द्यांवर सध्या एक गट काम करत आहे. भारताचं परराष्ट्र मंत्रालय, राष्ट्रीय सुरक्षा सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचा हा गट सातत्याने बैठका घेऊन आपली भूमिका ठरवत आहे. या गटाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या प्राथमिकतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताविरुद्ध वापर केला जाणार नाही, यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचा सल्लादेखील पंतप्रधान मोदी यांनी या गटाला दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद नुकतंच पंतप्रधान मोदींनी भूषवलं होतं. त्यात हा मुद्दा मांडण्यात आला होता. हे वाचा - अमेरिकी सैन्यातील शेवटच्या सैनिकाने सोडलं अफगाणिस्तान, कोण आहे हा व्यक्ती? अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या जवळपास 800 नागरिकांची भारतानं आतापर्यंत सुटका केली आहे. यात मूळ भारतीय नागरिकांसोबतच अफगाणिस्तानमधील निर्वासितांचाही समावेश आहे. तर अजूनही सुमारे 20 भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. काबुल विमानतळावरील सुरक्षेच्या प्रश्नामुळे भारताला तिथे पुढील विमान पाठवण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत हे विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात होतं. मात्र आता अमेरिकी सैन्यानं ते पूर्णतः रिकामं केलं असून त्याच्या सुरक्षेची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी कणाला दिली जाते, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतरच विमान पाठवून उरलेल्या भारतीयांना परत आणणं शक्य होणार आहे.
  Published by:desk news
  First published: