• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • नातीला वाचवण्यासाठी हिंस्र बिबट्यासोबत भिडले आजी-आजोबा आणि...; अंगावर काटा आणणारी घटना

नातीला वाचवण्यासाठी हिंस्र बिबट्यासोबत भिडले आजी-आजोबा आणि...; अंगावर काटा आणणारी घटना

या वृद्ध दाम्पत्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकत आपल्या नातीला वाचवण्यासाठी थेट बिबट्यासोबत पंगा (Fight With Leopard to Save Granddaughter) घेतला

 • Share this:
  भोपाळ 21 ऑगस्ट : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) श्योपूर जिल्ह्यामध्ये (Sheopur News) सध्या एका वृद्ध आजी आजोबांच्या धाडसाचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. कारण, या वृद्ध दाम्पत्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकत आपल्या नातीला वाचवण्यासाठी थेट बिबट्यासोबत पंगा (Fight With Leopard to Save Granddaughter) घेतला. सगळीकडे सध्या याच घटनेची चर्चा रंगली आहे. ही घटना श्योपूर जिल्ह्यातील कराहल गावातील आहे. घटनेत जय सिंह गुर्जर आणि बसंती बाई आपल्या एका वर्षाच्या नातीला घेऊन घराच्या अंगणात झोपले होते. बापरे! हे काय आहे? बाळाचा VIDEO पाहून आईला फुटला घाम मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधारात अचानक एक बिबट्या समोर आला आणि आपल्या आजी आजोबांसोबत अंगणात झोपलेल्या चिमुकलीला आपल्या जबड्यात उचलून घेऊन जाऊ लागला. यानंतर लहान मुलगी जेव्हा रडू लागली तेव्हा तिचा आवाज ऐकून आजी आणि आजोबांनी जाग आली. बिबट्याच्या तोंडात आपल्या नातीला पाहताच आपल्या जीवाची पर्वी न करता दोघंही बिबट्यासोबत भिडले. या दरम्यान वृद्ध दाम्पत्याच्या शरीरावर बिबट्याच्या नखांच्या आणि दातांच्या अनेक खुणाही उमटल्या आणि ते जखमीही झाले. VIDEO: रस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरी; 'ते' वागणं पाहून नवरदेवही हैराण आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्यही उठले. काहीच वेळाच गावातील इतर लोकही काठ्या घेऊन याठिकाणी जमा झाले, यानंतर बिबट्या लहान मुलीला तिथेच ठेवून फरार झाला. आजोबांच्या पायावर बिबट्याच्या दातानं मोठी जखम झाली. ज्या गावात ही घटना घडली ते गान कुनो नॅशनल पार्कच्या जवळच आहे. त्यामुळे, गावात आता भीतीच वातावरण पसरलं आहे. गावातील लोक आता काठ्या हातात घेऊन संपूर्ण रात्रभर राखण करतात जेणेकरून जंगली प्राणी गावात शिरू नयेत
  Published by:Kiran Pharate
  First published: