• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मेहबुबा मुफ्तींची जीभ घसरली, तालिबानचं उदाहरण देत मोदी सरकारला इशारा

मेहबुबा मुफ्तींची जीभ घसरली, तालिबानचं उदाहरण देत मोदी सरकारला इशारा

अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवाद्यांनी (Taliban) कब्जा करताच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची जीभ घसरली आहे. त्यांनी अफगाणिस्तानचे उदाहरण देत मोदी सरकारवर टीका केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 ऑगस्ट : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची जीभ घसरली आहे. त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानचे उदाहरण देत मोदी सरकारवर (Narendra Modi Govenment) टीका केली आहे. काश्मीरमधील लोकांचे धैर्य समाप्त होईल, त्या दिवशी तुम्ही पराभूत व्हाल, असं वक्तव्य मुफ्ती यांनी केले आहे. त्याचबरोबर काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुफ्ती यावेळी म्हणाल्या की, 'आपल्या शेजारच्या अफगाणिस्तानात बघा, जिथं महाशक्ती असलेल्या अमेरिकेला सैन्य माघारी घ्यावे लागले. त्यांना सर्व साहित्य घेऊन परत जाणे भाग पडले. कश्मिरी कमकुवत नाहीत. तर खूप संयमी आहेत. हे संयम ठेवण्यासाठी धाडस हवे.  त्यांच्या संयमाचा अंत होईल त्या दिवशी तुम्ही पराभूत व्हाल.' जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये त्या बोलत होत्या. यापूर्वी मुफ्ती यांनी मोदी सरकारवर सरकारी तपास यंत्रणांचं तालिबानीकरण केल्याचा आरोप केला होता. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात त्यांच्या आई गुलशन नजीर यांची ईडीनं तीन तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी हा आरोप केला होता. त्याचबरोबर त्यांनी यावेळी मीडियावरही आरोप केले. अफगाणिस्तानच्या अध्यक्षांचा भाऊ निघाला घरभेदी, तालिबानशी केली हातमिळवणी! मी फेररचना आयोगाला भेटण्यास नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या समन्स आले, असा आरोप मुफ्ती यांनी केला आहे. मी पाच ऑगस्ट रोजी शांततामय आंदोलन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा समन्स आले. एनआयए, ईडी या संस्थांची निर्मिती गंभीर कामांसाठी झाली आहे. दुर्दैवानं याचा वापार हा राजकारणी, विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या विरोधात केला जात आहे, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: