11 वर्ष 31 देश शोधत होते उपाय, बंद केला रिसर्च आणि तीन महिन्यांतच धडकला कोरोना

11 वर्ष 31 देश शोधत होते उपाय, बंद केला रिसर्च आणि तीन महिन्यांतच धडकला कोरोना

अमेरिका आणि चीन यांनी 31 देशांनासोबत घेऊन भयंकर विषाणू शोधण्यासाठी एका मोहिमेला सुरुवात केली होती. मात्र चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडण्याआधीच ही मोहिम बंद करण्यात आली.

  • Share this:

न्यूयॉर्क, 06 एप्रिल : कोरोनामुळे सध्या साऱ्या जगभरात हाहाकार माजला आहे. तब्बल 200 देशांमध्ये कोरोना पसरला आहे. जगभरात 12 लाख 73 हजार 990 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 69 हजार 444 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. चीनमधून आलेला व्हायरस सध्या जगाचे केंद्रस्थान झाला आहे. अद्याप एकाही देशाला यावर उपाय शोधता आलेले नाही. मात्र 11 वर्षांपूर्वी अमेरिका आणि चीन यांनी एकत्र जगभरातील धोकादायक व्हायरस शोधण्याच्या उद्देशाने एक मिशन सुरू केले होते. या मोहिमेमध्ये अमेरिका आणि चीनसह 31 देशांचा समावेश होता. अमेरिका आणि चीनमधील संबंध बिघडले आणि 3 महिन्यांतच कोरोना धडकला.

अमेरिका आणि चीन यांनी 31 देशांना सोबत घेऊन अशा प्रकारचे विषाणूंचा शोध घेणार होते जे प्राण्यांपासून मनुष्यात येऊ शकतात किंवा होऊ शकतात. मात्र कोरोना विषाणूने हजारो शास्त्रज्ञांचा विश्वासघात केला. शास्त्रज्ञांचा हा अभ्यास पूर्ण होण्याआधीच कोरोना दाखल झाला.

वाचा-मृत्यूचं केंद्र बनतंय हे रुग्णालय! एकाच खोलीत 40 मिनिटांत 10 रुग्णांचा मृत्यू

अमेरिका आणि चीन यांनी सुरू केलेल्या या आंतरराष्ट्रीय अभियानाचे नाव प्रेडिक्ट (PREDICT) होते. याला आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकन एजन्सीने अर्थसहाय्य दिले. मिशन अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पाचा उद्देश संपूर्ण जगामध्ये असे आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करणे होते जेणेकरुन व्हायरसच्या हल्ल्यापासून लोकांना वाचवता येईल.

वाचा-ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाचा धोका वाढला, रुग्णालयात केले दाखल

मात्र जेव्हा कोरोना विषाणू कोविड-19 किंवा सार्स-सीओव्हीने (SARS-CoV2) साऱ्या देशाचे कंबरडे मोडले. शास्त्रज्ञांना अभ्यास पूर्ण होण्याआधी कोरोना आला, त्यामुळे कोणत्याही देशाकडे याला रोखण्याची तयारी नव्हती.

वाचा-जगभरात कोरोनाचे धडकी भरवणारे आकडे, भारतातील रुग्णांमध्येही मोठी वाढ

कोरोनाचा शोध का लागला नाही?

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या व्हायरस रिसर्च सेंटरचे सहयोगी संचालक मायकेल बाचमेयर यांनी, माशाच्या जाळ्याप्रमाणे या मोहिमेतही अनेक त्रुटी आहेत. अंतर होते. पैशाची कमतरता होती. मानव संसाधन देखील कमी होते. या सगळ्यामुळे डिसेंबर 2019 मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार चीनमध्ये होऊ लागला. त्याआधी बरोबर तीन महिने अमेरिकन सरकारने या मोहिमेला निधी देणं बंद केलं. सध्या जगातील 6 लाखाहून अधिक व्हायरस शास्त्रज्ञांना ज्ञात आहेत. हे विषाणू असे आहेत की प्राणी मानवाकडून मनुष्यात येऊ शकतात. धोकादायक रोग होऊ शकतात. आपण संपूर्ण मानवजातीचा नाश करू शकतो. सर्वात धोकादायक व्हायरस वटवाघूळ, उंदीर आणि माकडांमध्ये आढळतात. त्यांच्यावर हजारो संशोधनही केले गेले आहे. मात्र कोरोना शोधणे शास्त्रज्ञांना जमेल नाही.

वाचा-आता प्राण्यांमध्येही पसरणार कोरोना? न्यूयॉर्कमध्ये वाघिणीनिघाली पॉझिटिव्ह

2007मध्येच झाले होते भाकित?

शास्त्रज्ञांना आधीच माहित होते की SARS कोरोना विषाणू धोकादायक आहे. २००AR 2002मध्ये सार्स चीनमध्ये दाखल झाली. यानंतर, जगातील 30 देशांना वेढले गेले. 2007 मध्ये हाँगकाँगच्या वैज्ञानिकांनी एक रिसर्चमध्ये कोरोना टाईम बॉम्ब आहे. कधीही फुटू शकते, असे लिहिले होते. पण याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

First published: April 6, 2020, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading