Home /News /videsh /

मृत्यूचं केंद्र बनतंय हे रुग्णालय! एकाच खोलीत 40 मिनिटांत 10 रुग्णांचा मृत्यू

मृत्यूचं केंद्र बनतंय हे रुग्णालय! एकाच खोलीत 40 मिनिटांत 10 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 5 महिन्यांमध्ये देशातल्या कोविड रुग्णांचा मृत्यूचा दर हा 2 टक्क्यांच्याही खाली केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 5 महिन्यांमध्ये देशातल्या कोविड रुग्णांचा मृत्यूचा दर हा 2 टक्क्यांच्याही खाली केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर सध्या मृत्यूचे केंद्र झाले आहे. येथे दररोज सरासरी 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे.

    न्यूयॉर्क, 06 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. आतापर्यंत येथे 9 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 37 हजार लोक येथे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर सध्या मृत्यूचे केंद्र झाले आहे. येथे दररोज सरासरी 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. रविवारी न्यूयॉर्कमधील रुग्णालयातील परिस्थितीने सर्वांना हादरवून टाकले आहे. येथे अवघ्या 40 मिनिटांत 10 लोकांचा मृत्यू झाला. मृतांच्या संख्येत अचानक वाढ सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. रविवारी, 40 मिनिटांत 10 रूग्णांचा मृत्यू झाला आणि तेही केवळ एका आपत्कालीन कक्षात. त्यापैकी 6 रुग्णांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. तर 4 रुग्ण आपत्कालीन कक्षातही पोहोचू शकले नाहीत. इथल्या एका डॉक्टरांनी सांगितले की, लोक इतके आजारी आहेत की डोळ्याच्या पापण्या मिटण्याआधीच एकाचा मृत्यू होतो आहे. एवढेच नव्हे तर व्हेंटिलेटर बसवताच लोकांचा मृत्यू होत आहे, असेही ते म्हणाले. वाचा-मराठी पंतप्रधानांची कमाल, कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी लिओ वराडकर पुन्हा डॉक्टर 25% लोकांचा मृत्यू ब्रूकलेनच्या या रुग्णालयात केवळ कोरोना रूग्णांवरच उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की येथे दाखल झालेले सुमारे 25 टक्के लोक मरत आहेत. डॉक्टर लॉरेन्झो पालिडेनो म्हणतात की हा रुग्णालयाचा दोष नाही, परंतु हा आजार असा आहे की काही लोकांना वाचवणे कठीण होते. वाचा-ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाचा धोका वाढला, रुग्णालयात केले दाखल सतत होत आहेत मृत्यू या रुग्णालयाचे कर्मचारी 24 तास सातत्याने कार्यरत असतात. त्यांना श्वास घेण्यासही वेळ नसतो. याचा अंदाज बांधला जाऊ शकतो की रुग्णाच्या मृत्यूनंतर लगेचच जागा रिक्त करून अर्ध्या तासाच्या आत स्वच्छ केली जाते. आणि मग दुसरा रुग्ण तिथे ठेवला जातो. येथे दाखल झालेल्या 90 टक्के रुग्णांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त आहे. तर 60 टक्के रुग्णांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. वाचा-आता प्राण्यांमध्येही पसरणार कोरोना? न्यूयॉर्कमध्ये वाघिणीनिघाली पॉझिटिव्ह जगभरात हाहाकार जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत तब्बल 12 लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाच्या संसर्गामुळे 69 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत तीन लाख 20 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 9 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या