जगभरात कोरोनाचे धडकी भरवणारे आकडे, भारतातील रुग्णांमध्येही मोठी वाढ

जगभरात कोरोनाचे धडकी भरवणारे आकडे, भारतातील रुग्णांमध्येही मोठी वाढ

अमेरिकेत तीन लाख 20 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 9 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल : जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत तब्बल 12 लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाच्या संसर्गामुळे 69 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत तीन लाख 20 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 9 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, भारतात आणखी 472 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून आणखी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. विविध राज्यांमधील वृत्तानुसार देशात आतापर्यंत करोनामुळे 106 जणांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या 3624 वर पोहोचली आहे. त्यापैकी 284 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

देशातील 62 जिल्ह्यांत 80 टक्के रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 274 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये करोनाची लक्षणं दिसून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लक्षणीय बाब म्हणजे देशातील एकूण जिल्ह्यांपैकी 62 जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याचं समोर आलं आहे.

भारतातील एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे या 62 जिल्ह्यांमधील आहे. त्यामुळे 14 एप्रिल नंतर देशभरात लॉकडाउन हटवण्यात आला, तरी या 62 जिल्ह्यांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउन बाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज होणार महत्त्वपूर्ण बैठक

देशपातळीवर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 1 वाजता होणार बैठक होईल. यामध्ये सर्व केंद्रीय मंत्री व्हिडिओ कॉन्फरसच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.

First published: April 6, 2020, 9:04 AM IST

ताज्या बातम्या