आता प्राण्यांमध्येही पसरणार कोरोना? न्यूयॉर्कमध्ये वाघिणीची चाचणी पॉझिटिव्ह

आता प्राण्यांमध्येही पसरणार कोरोना? न्यूयॉर्कमध्ये वाघिणीची चाचणी पॉझिटिव्ह

मात्र आता फक्त माणसांना नाही तर न्यूयॉर्कमध्ये प्राण्यांनाही कोरोनाही लागण झाली आहे. न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातील वाघिण कोरोना पॉझिटिव्ह आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 06 एप्रिल : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर वेगाने पसरत आहे आणि अमेरिका कोरोनाचे नवे केंद्र झाले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहे. मात्र आता फक्त माणसांना नाही तर न्यूयॉर्कमध्ये प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातील वाघिण कोरोना पॉझिटिव्ह आहे.

न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात वाघिण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या विभागानुसार प्राण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही पहिली घटना आहे. ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचा-याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघही त्याच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना झाला.

वाचा-जगभरात कोरोनाचे धडकी भरवणारे आकडे, भारतातील रुग्णांमध्येही मोठी वाढ

अमेरिकेत सध्या 3 लाख 36 हजार 958 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे 9 हजार 626 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त रुग्ण हे न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये प्रत्येक मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे.

वाचा-10 जूनपर्यंत असणार लॉकडाउन? WHOच्या व्हायरल वेळापत्रकामागचे हे आहे सत्य

अन्य 5 प्राण्यांचे घेतले सॅम्पल

न्यूयॉर्कमधील हे प्राणीसंग्रहालय 16 मार्चपासून बंद आहे. ज्या वाघिणीला कोरोना झाला आहे तीचे नाव नादिया असून, काही दिवसांपूर्वी तिची चाचणी करण्यात आली होती. यात नादिया कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यामुळं आता इतर 5 सिंह आणि वाघांचे नमुने घेण्यात आले आहेत, इतर प्राणीसंग्रहालयातील सिंहामध्ये ही लक्षणे दिसत आहेत. प्राणिसंग्रहालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारावर वाघांची बहीण अजूल, अमूर टायगर्स आणि 3 आफ्रिकन सिंहांना कोरडा खोकला आला होता आणि लवकरच बरे होण्याची शक्यता आहे. तथापि, त्याची लक्षणे इतर प्राण्यांमध्ये दर्शविली गेली नाहीत.

वाचा-तुमची ही छोटीशी चूक पडेल महागात, व्हाल Coronavirus चे शिकार

First published: April 6, 2020, 9:08 AM IST

ताज्या बातम्या