Home /News /videsh /

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाचा धोका वाढला, रुग्णालयात केले दाखल

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाचा धोका वाढला, रुग्णालयात केले दाखल

पंतप्रधान कार्यालयाने माहितीनुसार, बोरिस यांना कोरोनाची लाही लक्षणे दिसत होती. त्यामुळं डॉक्टरांनी बोरिस यांची कोरोना चाचणी केली आहे.

    लंडन, 06 एप्रिल : चीनपासून सुरू झालेल्या कोरोनाने आता अनेक राजकारण्यांनाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. बोरिस यांना कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बोरिस यांना कोरोनाची काही लक्षणे दिसत होती. त्यामुळं डॉक्टरांनी बोरिस यांची कोरोना चाचणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 दिवसांपूर्वी बोरिस जॉन्सन यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आलं होतं. ब्रिटिश पीएमओच्या म्हणण्यानुसार त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसल्याचेही स्पष्ट केले आहे आणि जॉन्सन सरकार चालवत राहतील, असंही सांगितलं. वाचा-आता प्राण्यांमध्येही पसरणार कोरोना? न्यूयॉर्कमध्ये वाघिणीनिघाली पॉझिटिव्ह असे सांगितले जात आहे की ब्रिटीश पंतप्रधानांना कोरोनाची चिन्हे दिसल्यानंतर 26 मार्च रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी डाउनिंग स्ट्रीट येथे स्वत:ला क्वारंटाइन केले. क्वारंटाइनमध्येही बोरिस काम करत आहेत. इतकेच नव्हे तर यावेळी त्यांनी देशाला एक व्हिडिओ संदेशही दिला. या व्हिडीओच्या माध्यमातून जिथे त्यांनी ब्रिटनमधील लोकांना कोरोनाशी लढा देण्याचा संदेश दिला तेथे त्यांनी आपल्या सुधारणांबद्दलही माहिती दिली. वाचा-जगभरात कोरोनाचे धडकी भरवणारे आकडे, भारतातील रुग्णांमध्येही मोठी वाढ ब्रिटनमध्ये 4,932 लोकांचा झाला मृत्यू ब्रिटनमध्ये कोरोनाची गंभीर परिणाम दिसत आहेत. देशात आतापर्यंत 47 हजार 806 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 4 हजार 932 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनच्या बर्‍याच मोठ्या व्यक्तींनाही कोरोनाचा फटका बसला आहे. यामध्ये प्रिन्स प्रिन्स चार्ल्स आणि पीएम जॉन्सन यांची नावे आहेत. कोविड-19 आजारामुळे ब्रिटनमध्ये एका 5 वर्षांच्या मुलाचाही मृत्यूही झाला. वाचा-10 जूनपर्यंत असणार लॉकडाउन? WHOच्या व्हायरल वेळापत्रकामागचे हे आहे सत्य जगभरात हाहाकार जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत तब्बल 12 लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाच्या संसर्गामुळे 69 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत तीन लाख 20 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 9 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या