मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सीलिंगमधून गोळी गेली आरपार; खालच्या मजल्यावर झोपलेल्या भारतीय मुलीचा गेला जीव - अमेरिकेतली घटना

सीलिंगमधून गोळी गेली आरपार; खालच्या मजल्यावर झोपलेल्या भारतीय मुलीचा गेला जीव - अमेरिकेतली घटना

आपल्या घरात गाढ झोपेत असलेल्या तरुणीला वरच्या मजल्यावरून मारलेली (19 year old girl died after bullet pierce through ceiling) गोळी लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  desk news

अलबामा, 30 नोव्हेंबर: आपल्या घरात गाढ झोपेत असलेल्या तरुणीला वरच्या मजल्यावरून मारलेली (19 year old girl died after bullet pierce through ceiling) गोळी लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय मुलीचा या विचित्र घटनेत (Strange incident of death) मृत्यू झाला आहे. वरच्या मजल्यावरील व्यक्तीने मारलेली गोळी सीलिंग भेदून थेट तिच्या डोक्यात घुसली आणि तिचा मृत्यू झाला.

अशी घडली घटना

मूळची केरळची असणारी मरियम सुसान मॅथ्यू नावाची 19 वर्षांची तरुणी अमेरिकेत राहत होती. अमेरिकेच्या अलबामा भागातील माँटगोमेरी भागातील एका बहुमजली इमारतीत ती राहत होती. तिच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या बंदूकधारी इसमाने गोळी झाडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी मरियम गाढ झोपेत होती. त्यावेळी तिच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीने जमिनीत गोळी मारली. या इमारतीचं सीलिंग कमकुवत असल्यामुळे ती गोळी सिलिंगला भेदून खाली आली आणि खालच्या मजल्यावर झोपलेल्या मरियमच्या डोक्यात घुसली. या घटनेत मरियमचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरू

स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. ही गोळी हेतूपूर्वक चालवण्यात आली की तो एक अपघात होता, या दृष्टीनंही पोलीस तपास करत आहेत.

हे वाचा- बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी रचलं खोटं लग्न, भाड्याच्या नवऱ्यासोबत केलं फोटोशूट

मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न

मरियम ही केरळचे मूल निवासी बॉबेन मॅथ्यु यांची मुलगी होती. केरळच्या पटनमतिट्टा जिल्ह्यात त्यांचं मूळ गाव असून अमेरिकेतून मृतदेह भारतात आणण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला असून गाढ झोपेत असलेल्या मुलीचा अशा प्रकारे डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: America, American indians, Crime, Kerala, Police