मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी रचलं खोटं लग्न, भाड्याच्या नवऱ्यासोबत केलं फोटोशूट

बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी रचलं खोटं लग्न, भाड्याच्या नवऱ्यासोबत केलं फोटोशूट

ब्रेकअप झालेल्या बॉयफ्रेंडला पुन्हा स्वतःकडं आकर्षित करण्यासाठी एका तरुणीनं (Girl arranged her fake wedding to attract attention of her boyfriend) स्वतःच्या लग्नाचं नाटक केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: ब्रेकअप झालेल्या बॉयफ्रेंडला पुन्हा स्वतःकडं आकर्षित करण्यासाठी एका तरुणीनं (Girl arranged her fake wedding to attract attention of her boyfriend) स्वतःच्या लग्नाचं नाटक केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. स्वतः या मुलीनंच टिकटॉकवरून (Revealed the story on Tiktok) आपल्या या प्रयत्नाची कबुली दिली आहे. आपला बॉयफ्रेंड आपल्याकडे परत यावा, या अपेक्षेनं त्याला जळवण्यासाठी तरुणीनं (Photo shoot with rented husband) स्वतःच्या लग्नाचा बनाव रचला. त्यासाठी बनावट पतीसोबत फोटोशूटही केलं.

बॉयफ्रेंडसाठी वाट्टेल ते

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवसांनी तरुणीला त्याच्याविषयी पुन्हा आकर्षण वाटायला सुरुवात झाली. आपल्या लग्नाची बातमी ऐकून त्याला पाझर फुटेल आणि तो आपल्याकडे परत येईल, असा तिचा अंदाज होता. त्यासाठी तिनं सोशल मीडियावर स्वतःच्या लग्नाची बातमी व्हायरल करण्याचा निर्णय घेतला.

पती घेतला भाड्याने

एका तरुणाला पैसे देऊन तिने या कामासाठी तयार केलं. त्याचप्रमाणं एक हॉल बुक करून प्रोफेशनल फोटोग्राफरलाही आमंत्रित केलं. फोटोशूटमध्ये आपण दुसऱ्याच एका तरुणाच्या प्रेमात पडलो आहोत, असं दाखवण्याचा तिचा प्रयत्न होता. त्यासाठी तिने भाड्याच्या पतीसोबत वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले. यासाठी तिने जोरदार खर्च केला आणि कुठलीही गोष्ट बनावट किंवा खोटी वाटू नये, याची काळजी घेतली. आपला बॉयफ्रेंड हा फोटो पाहिल आणि ताबडतोब त्याचा आपल्याला फोन येईल, या प्रतिक्षेत ती होती.

हे वाचा- फोटोत दिसणाऱ्या या आई-वडिलांसाठी अभिमानास्पद क्षण, मुंबईकर मुलाची जगभर चर्चा

पुढे काय झालं?

आता बॉयफ्रेंडने ते फोटो पाहिले का आणि पुढे काय झालं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर बॉयफ्रेंडने ते पाहिले. मात्र दुर्दैवाची बाब अशी की त्याने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवस ही तरुणी बॉयफ्रेंडच्या प्रतिसादाची वाट पाहत होती. मात्र अखेरपर्यंत त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. आपलं हे दुःख तिने टिकटॉक व्हिडिओतून मांडलं आहे. यावर लग्न झालेल्या गर्लफ्रेंडकडे बॉयफ्रेंड कशाला परत येईल, असा सवाल युजर्सनी तरुणीला विचारला आहे.

First published:

Tags: Boyfriend, Fake, Girlfriend, Marriage